नागपूर : प्रतिनिधी
प्रत्येक दाम्पत्याला किमान तीन मुले हवीत, असे वक्तव्य करून सरसंघचालकांनी खळबळ उडवून दिली आहे. कुलनीती चालली पाहिजे त्यातून संस्कृती एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जाते. आपली संस्कृती टिकविली जाते. महिलेचे महत्त्व आपल्या संस्कृतीत मातेचे असते, पाश्चात्त्य संस्कृतीत पत्नीचे असते. धन माणसाजवळ असावं पण ते आवश्यकतेपेक्षा जास्त असू नये, असे सरसंघचालकांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिंहाचा वाटा आहे. घरात लागलेले वळण फार महत्त्वाचे असते कारण ते परंपरेने चालत आलेले असते. पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे त्यांच्याकडे सुद्धा संस्कृती होती. पण त्यांना आता त्याचा विसर पडला आहे. मात्र आपल्याकडे संस्कृती अजून जपली जात आहे. घरातील लहान लहान गोष्टींतून आपली संस्कृती जपली जाते ही व्यवस्था आपल्याकडे आहे. कुटुंबापासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते, असे सरसंघचालक म्हणाले.
सध्या लोकसंख्येत कमाल घसरण होत आहे. हा चिंतेचा विषय आहे. आधुनिक लोकसंख्या शास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या २.१ च्या खाली जाते. तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो. त्याला कोणी संपवण्याची गरज नसते. उलट एखादे संकट उद्भवल्यास तो समाज आपोआप नष्ट होतो. अशाच प्रकारे अनेक भाषा आणि समाज नष्ट झाल्या आहेत, असे भागवत यांनी स्पष्ट केले.