29.4 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeलातूरप्रा. मोटेगावकरांच्या ‘आरसीसीची’ ११ वी नीट, जेईई प्रवेशासाठी १४ जानेवारी रोजी स्कॉलरशिप परीक्षा

प्रा. मोटेगावकरांच्या ‘आरसीसीची’ ११ वी नीट, जेईई प्रवेशासाठी १४ जानेवारी रोजी स्कॉलरशिप परीक्षा

लातूर : प्रतिनिधी
देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या प्रा. मोटेगावकर सरांच्या आरसीसीने १० वी तून इयत्ता ११ वीत जाणा-या विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. आरसीसी मध्ये प्रवेश मिळविण्यासाठीची आरसीसी-सेट ही स्कॉलरशिप परीक्षा ही दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्रातील तब्बल ५० पेक्षा जास्त शहरात एकाच वेळेत ही परीक्षा पार पडणार असून यासाठी  विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या परीक्षेसाठीची नोंदणी आरसीसीची वेबसाईट ६६६.१ूूस्रं३३ी१ल्ल.ूङ्मे यावर विनाशुल्क उपलब्ध असल्याची माहिती आरसीसी व्यवस्थापनाने दिली आहे.
मागील तब्बल २३ वर्षांपासून आपल्या गुणवत्तापूर्ण अध्यापनाच्या बळावर विश्वास, नेत्रदीपक निकाल आणि त्या निकालातील सातत्य,  देशभरात नावलौकिक प्राप्त केलेल्या प्रा. शिवराज मोटेगावकर सरांच्या आरसीसी तर्फे दरवर्षी महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील गुणवंत, होतकरु, आर्थिक दृष्ट्यादुर्बल असलेल्या पालकांच्या पाल्यासाठी स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करण्यात  आले आहे. या परीक्षेसाठी स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्डच्या विद्यार्थ्यांना मेडिकल -पिसीबी ग्रुपसाठी इयत्ता १० विज्ञान (सायन्स) तर इंजिनियंिरग झ्रपिसिएम ग्रुपसाठी  १० विज्ञान (सायन्स)आणि गणित (मॅथस्) हे अभ्यासक्रमाचे विषय आहेत. परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची तसेच ९० मिनिटांची  असेल .या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे ठिकाण  एसएमएस द्वारे तसेच हॉलतिकीटद्वारे १० तारखेनंतर जाहीर करण्यात येईल .
परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करणा-या ६० टॉपर  विद्यार्थ्यांना एम्स बॅचमध्ये प्रवेश मिळणार आहे. याशिवाय टॉपर विद्यार्थी अर्जुना, सुपर फोटॉन, फोटॉन या कमी विद्यार्थी संख्या असलेल्या स्पेशल बॅचेस मध्ये प्रवेश मिळणार आहे. तसेच आयआयटी-जेईईची तयारी करु इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठीही स्पेशल बॅच असणार आहे. तरी लवकरच लवकर आरसीसी -सेट परीक्षेकरिता रजिस्ट्रेशन करून भविष्यात आपले डॉक्टर-इंजिनिअर होण्याच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाका असे आवाहन ‘आरसीसी’ व्यवस्थापनाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR