28.7 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeमहाराष्ट्रप्रेमविवाहानंतर आरोपीस सात वर्षांचा मुलगा

प्रेमविवाहानंतर आरोपीस सात वर्षांचा मुलगा

आरोपी गाडेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

पुणे : प्रतिनिधी
पुणे- स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडे याने प्रेमविवाह करून सुखाने संसार सुरू केला होता. त्याला सात वर्षांचा मुलगादेखील आहे.

मात्र, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तो कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पत्नीशी व कुटुंबीयांशीही त्याचे सातत्याने वाद सुरू होते. त्याचा भाऊ शेती करतो. मात्र, आरोपी शेतीकडेही लक्ष न देता विविध ठिकाणी फिरत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता. यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

घटनेच्या दिवशी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास स्वारगेट पोलिसांचे एक पथक थेट त्याच्या घरी चौकशीस आल्यानंतर त्यांनी आरोपीसारखे साधर्म्य असलेल्या भावाला उचलून तपास सुरू केला. ही माहिती आरोपीलादेखील समजली. कधीही न बोलणा-या चुलत भावाचा त्याला फोन आला. या वेळी त्याने घरी आई पडल्याचे सांगितल्याने आरोपीला संशय आला व त्याने त्याचा फोनच बंद करून पलायन केले.

याचदरम्यान गुन्हे शाखेचे पथक व स्वारगेट पोलिसांनी आरोपीच्या गावाच्या परिसरातील शेताकडे तो गेल्याची माहिती मिळाल्याने शोध सुरू केला. पोलिसांची १६ ते १७ पथके, ग्रामस्थ, पोलिस पाटील, गावातील तरुणांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्याचसोबत जवळपासच्या पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांनाही बोलावून पोलिसांनी साडेतीन हजार लोकांची बैठक घेत त्यांना शोधमोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR