24.8 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीस, पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला

फडणवीस, पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला

मुंबई : प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हीडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. काल या घटनेची छायाचित्रे पाहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

या संदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, फक्त धनंजय मुंडेंच्या राजीनामा घेतला म्हणून सरकार आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ का केले नाही हा खरा प्रश्न आहे. या अमानवी कृत्यांचे सगळे फोटो, व्हीडीओ, पुरावे सुरुवातीपासून पोलिसांकडे होते म्हणजेच गृहमंत्री व सरकारकडे होते. या सैतानांच्या टोळीची अमानवी कृत्यांची संपूर्ण माहिती असूनही दोन महिने सरकार धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे या टोळीला सरकारचा पाठिंबा होता आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबायचे होते हे स्पष्ट होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR