24.4 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeराष्ट्रीयफिंगरप्रिंटशिवाय आधारकार्ड तयार होणार

फिंगरप्रिंटशिवाय आधारकार्ड तयार होणार

नवी दिल्ली : आधार कार्ड फक्त ओळखपत्र राहिले नाही तर प्रमुख कागदपत्र झाले आहे. प्रत्येक ठिकाणी आधारकार्डचा वापर केला जातो. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डचा वापर केला जातो. दरम्यान, आता आधारकार्ड तयार करण्यासाठी फिंगरप्रिंटची गरज लागणार नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया यांनी आज याबाबतची माहिती दिली.

आधारकार्ड तयार करण्याच्या नियमांत सरकारने बदल केला आहे. बोटाचे ठसे नसणा-या व्यक्तींसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. अशा व्यक्तींची आधार नोंदणी करण्यासाठी आयरिस स्कॅनचा वापर करण्यात येणार आहे. जे शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत, म्हणजे ज्यांना हात किंवा बोटे नाहीत, त्यांना आधार कार्ड बनवणे आता सोपे झाले आहे. नव्या नियमांतर्गत बोटांचे ठसे नसताना डोळ््यांच्या स्कॅनद्वारेही आधार काढता येणार आहे.

केरळमधील एका व्यक्तीला बोटे नसल्याच्या कारणास्तव आधार नोंदणी करता आली नाही. त्यामुळे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तिची नावनोंदणी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR