फेसबुकसाठी हवी पालकांची परवानगी!

केंद्र सरकारने तयार केला मसुदा, केंद्राने मागविल्या सूचना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आता १८ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर अकाऊंट उघडायचे असेल तर यापुढे पालकांची परवानगी घेणे बंधनकारक केले जाणार आहे. हा नियम डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम २०२५ च्या मसुद्यात समाविष्ट केला आहे. केंद्र सरकारने आज यासंबंधीचा मसुदा सार्वजनिक केला आहे. त्यामुळे या मसुद्याचे कायद्यात रुपांतर झाल्यास भविष्यात मुलांना फेसबुकसह सोशल मीडियावर अकाऊंट उघडायचे असेल तर पालकांची परवानगी घेणे बंधनकारक होणार आहे.

दरम्यान, या मसुद्यावर काही आक्षेप असेल किंवा त्याबाबतीत काही सूचवायचे असेल किंवा सूचना असतील, तर संबंधितांनी त्या सूचना थेट सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटद्वारे केले आहे. सध्या भारतात मोबाईल फोन हा प्रत्येकाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यातही स्मार्टफोनशिवाय आता लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून अगदी एक, दोन वर्षांच्या मुलांपासून १८ वर्षांच्या मुलांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे व्यसन जडले आहे. अशा स्थितीत मोबाईलवर सोशल मीडियाचा वापर करताना त्यावर पालकांचे लक्ष असणे आवश्यक आहे. त्यासाठी मुळात पालकांचीच परवानगी घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम जाणवत असल्याने केंद्र सरकारने याबाबत कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आता केंद्र सरकारने लहान मुलांना सोशल मीडियाच्या वापरासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याचा अंतर्भाव नव्या पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्यात करण्यात आला आहे.

वेबसाईटवर प्रतिक्रिया नोंदवा
केंद्र सरकारने नागरिकांच्या सहभागासाठीचा प्लॅटफॉर्म असलेल्या मायजीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर नागरिकांना या विधेयकाच्या मसुद्यावर आपल्या सूचना नोंदविता येणार आहेत. या सर्व सूचनांवर १८ फेबु्रवारी २०२५ नंतर विचार केला जाणार आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55

Latest news