24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रबजरंग सोनवणे यांच्या खासदारकीला आव्हान

बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीला आव्हान

औरंगाबाद खंडपीठात याचिका, सोनवणेंना नोटीस
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
बीड लोकसभा मतदारसंघात धुरळा उडवून देणारे बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंगबप्पा यांनी बीडच्या हायहोल्टेज लढतीत विजय खेचून आणला. त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला. मात्र, त्यांच्या निवडीलाच आव्हान देण्यात आले आहे.
माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी सदर याचिका दाखल केली आहे. आज याचिकेवर न्या. ए. एस. वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सोनवणे यांच्यासह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्यात आली. आता पुढील सुनावणी २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
प्रतिवादी बजरंग सोनवणे यांनी नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवलेली आहे. या मुद्यावर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली. प्रतिवादींना ४ आठवड्याची मुदत देत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अ‍ॅड. शशिकांत ई. शेकडे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. पृथ्वीराज ए. ढाकणे, अ‍ॅड. बी. एस. बोडखे, अ‍ॅड. विशाल थावरे, अ‍ॅड. आर.जी. नरवडे व एन. एस. राठोड यांनी सहकार्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR