28.7 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeराष्ट्रीयबजेटची व्युत्पत्ती, जगातील पहिला अर्थसंकल्प

बजेटची व्युत्पत्ती, जगातील पहिला अर्थसंकल्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बजेट हा शब्द लॅटिन भाषेतील ‘बल्गा’ या शब्दापासून तयार झाला आहे. फ्रेन्चमध्ये याला ‘बुगुएट’ असंही म्हणतात. हा शब्द इंग्रजीत म्हटल्यावर तो ‘बोजेट’ झाला. पुढे या शब्दाला बजेट असं संबोधलं जाऊ लागलं. जगातील जवळजवळ सर्वच देशांनी याचा अवलंब केला.

पहिला अर्थसंकल्प : सर्वप्रथम कोणत्या देशानं अर्थसंकल्प सादर केला, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यात सर्वप्रथम इंग्लंडचे नाव पुढे आले. खरे तर देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची सुरुवात तिथूनच झाली. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार पहिला अर्थसंकल्प १७६० साली सादर करण्यात आला होता. त्यानंतर १८१७ मध्ये फ्रान्समध्ये आणि १९२१ मध्ये अमेरिकेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

भारतात १८६० मध्ये सुरुवात : भारतात बजेटची सुरुवात इंग्रजांच्या काळात झाली. १८५७ च्या उठावानंतर जेम्स विल्सन या थोर अर्थतज्ज्ञाला इंग्रजांनी आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी भारतात बोलावले. ७ एप्रिल १८६० रोजी त्यांनी भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. २६ नोव्हेंबर १९४७ रोजी आरके षनमुगम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR