22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeहिंगोलीबांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच घोषणाबाजी

बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच घोषणाबाजी

मतदानाच्या गोपनीयतेचा भंग

हिंगोली : प्रतिनिधी
राज्यातील २२६ नगर परिषदा आणि ३८ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिली आहे. त्यानुसार अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी झाली आहे.

हिंगोलीतील कळमनुरी येथेही मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र शिवसेना शिंदेसेनेच्या आमदारांकडूनच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे. शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे.

परंतु संतोष बांगर यांनी मतदान केल्यानंतर केंद्रात घोषणाबाजी केली. याशिवाय बांगर यांनी एका महिला मतदाराला जाऊन सांगितले कुठे मतदान करायचे? ईव्हीएमचे बटण दाबताना बांगर यांच्याकडून महिलेस सूचना देण्यात आल्या. यावेळी मतदान केंद्रातला बांगर यांचा वावरही संशयास्पद जाणवला.

मतदान केंद्रात येताच बांगर यांनी ‘स्व. बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है’, असे म्हणत घोषणाबाजी केली. याप्रकरणी आता बांगर यांच्यावर निवडणूक आयोगाकडून काय कारवाई केली जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR