19.3 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयबांगलादेशात भारत विरोधी आंदोलनात साडींची होळी

बांगलादेशात भारत विरोधी आंदोलनात साडींची होळी

ढाका : वृत्तसंस्था
बांग्लादेशात अल्पसंख्याक हिंदुंवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) संयुक्त सरचिटणीस रूहुल कबीर रिजवी यांनी ढाका येथे आपल्या पत्नीची भारतीय साडी जाळली व भारताविरोधात आंदोलन सुरू केलं.
रिजवी यांनी आंदोलनादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह सर्वांनाच भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. त्रिपुराच्या राजधानीत बांग्लादेशच्या सहायक उच्चायोगातील कथित तोडफोड आणि बांग्लादेशी झेंड्याच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी रिजवीने भारताविरोधात हे आंदोलन केले. दरम्यान, रिजवीने आपल्या पत्नीची भारतीय साडी पेटवून देत भारतातून येणा-या वस्तू विकत घेऊ नका, असं उपस्थितांना आवाहन केलं. ज्या लोकांनी आपला राष्ट्र ध्वज फाडला, त्यांचं कुठलही साहित्य आम्ही घेणार नाही, असं रिजवी म्हणाला.
आमच्या माता-भगिनी आता भारतीय साडी परिधान करणार नाहीत. भारतीय साबण, टुथपेस्टही वापरणार नाहीत, असं रिजवी म्हणाला. मिरची आणि पपईचे उत्पादन आम्ही स्वत: करु. आम्हाला त्यांच्या चीजवस्तूंची आवश्यकता नाही, असे रिजवी म्हणाला.
दिवसात एकदाच जेऊ पण…
आम्ही कधी भारतीय झेंड्याचा अवमान करणार नाही. पण आपल्या देशाविरुद्ध चुकीची कृती सहन करणार नाही. भारतीय उत्पादनांवर बहिष्कार हे शांततामय मार्गाने ताकतवर उत्तर आहे. बांग्लादेशने याआधी सुद्धा छळ करणा-यांना पराजित केले. बांग्लादेश कुठल्याही ताकतीसमोर झुकणार नाही, भले मग आम्ही दिवसात एकदाच जेऊ. पण त्यानंतरही आम्ही गर्वाने उभे राहू, आत्मनिर्भर राहू, असं रिजवी म्हणाला.
पाकिस्तानकडून रसद
या घडामोडी घडत असताना बांगलादेशाने तुर्कीकडून १० किलर ड्रोन विकत घेतले. त्यातील ६ ड्रोनची डिलिव्हरी चटगाव येथे देण्यात आली. अजून ४ किलर ड्रोनची डिलिव्हरी झालेली नाही. भारतीय गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशात दहशतवाद्यांना तुरुंगातून बाहेर काढण्याचा सपाटा सुरू आहे. बांगलादेशातील कट्टरपंथी आता पाकिस्तानच्या बाजूने भारतविरोधी काम करण्याची योजना आखत आहेत. त्यासाठी पाकिस्तानकडून त्यांना रसद मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR