22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeलातूरबाजारपेठेत नागपूरच्या संत्र्यांची आवक वाढली 

बाजारपेठेत नागपूरच्या संत्र्यांची आवक वाढली 

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शहरातील फ्रुट बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणावर संत्रीची आवक वाढली आहे. नागपूरच्या संत्रीला ग्राहक पसंती देत असल्याने आवक वाढली आहे. दरम्यान, अचानक आवक वाढल्याने संत्रीच्या दरात घसरण झाली आहे. राजस्थानसह पंजाबमधील किनोमधूनदेखील संत्रीची आवक शहरातील बाजारपेठेत होत आहे. राजस्थानमधून जरी संत्रीची आवक होत असली तरी नागपूरी गोड संत्रीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
शहरातील फळबाजार समितीमध्ये दिवसाला जवळपास एक हजार ते दोन हजार पेटी संत्रीची आवक होत आहे. यामध्ये नागपूर, अहमदनगर आणि राजस्थानमधून संत्रा शहरातील मार्केटमध्ये दाखल होत आहे. येणा-या आवकपैकी ६० टक्के आवक ही नागपूरमधून होत आहे. सध्या किरकोळ बाजारात संत्रीला किलोला ५० ते ६० रुपये किलो भाव असल्याचे व्यापारी तुळशीराम घोणे यांनी एकमत’शी बोलताना सांगितले.  शहरातील फळ बाजारात नागपूरची संत्री मोठया प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून शहर व परिसरातील प्रत्येक हातगाडीवर संत्रीची विक्री होताना दिसत आहे.
शहरातील किरकोळ बाजारात संत्री ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सुरुवातीला बाजारात २०० ते ३०० रूपये पेटी असणारी आवक सध्या वाढली असून ती २००० पेटीपर्यंत पोहोचली आहे. बाजार समितीमध्ये निघालेल्या सौद्यात एका पेटीचा दर ३०० ते ८०० रुपये झाला असून सरासरी दर ५०० रुपये निघाला आहे. मात्र, किरकोळ बाजारपेठेत संत्रीची विक्री ५० ते ६० रुपये किलोनी विक्री होत असल्याचे किरकोळ व्यापा-यांनी सागीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR