34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रबायको सासरी येत नसल्याच्या रागातून सास-याचा खून

बायको सासरी येत नसल्याच्या रागातून सास-याचा खून

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील औरंगपूर गावात मंगळवारी रात्री घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली. केवळ पत्नी सासरी परत येत नसल्याच्या रागातून संतप्त झालेल्या जावयाने समजूत काढायला आलेल्या सास-याच्या छातीत चाकूने वार करत त्यांचा निर्घृण खून केला. ही थरकाप उडवणारी घटना मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री साधारणत: ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनेनंतर आरोपी जावई पळून गेला होता, मात्र ग्रामीण पोलिसांच्या चोख तपासामुळे त्याला बुधवारी अटक करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव सुभाष रूपचंद भगुरे (वय ४७, रा. औरंगपूर) असून, आरोपीचे नाव मनोज गुलाब गटोरसिंग (वय २८, रा. रेलगाव, ता. सिल्लोड) आहे. चार वर्षांपूर्वी सुभाष भगुरे यांच्या मुलीचा विवाह मनोज गटोरसिंग याच्याशी झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत चालला, पण गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये मतभेद वाढले. जयश्री भगुरे, ही काही काळापासून माहेरीच राहात होती आणि सासरी परतण्यास नकार देत होती.

यामुळे मनोज संतप्त आणि अस्वस्थ होता. जयश्रीच्या सास-यांनी सुभाष भगुरे यांनी जावयाला समजावण्यासाठी माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेतला. मात्र, रागाच्या भरात अंध झालेल्या मनोजने सास-याशी वाद घालून त्यांच्यावर थेट चाकूहल्ला केला. छातीत झालेल्या गंभीर वारामुळे सुभाष भगुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी मनोज गटोरसिंग घटनास्थळावरून फरार झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR