23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीत कोणत्या पवारांचे वर्चस्व ?

बारामतीत कोणत्या पवारांचे वर्चस्व ?

सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील उमेदवाराची उत्सुकता

पुणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची धावपळ वेगाने सुरू झाली असून संभाव्य उमेदवारांच्या निवडीकडे कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्या दृष्टीने बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये गणिते मांडली जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने बारामती लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाली असून याच मतदार संघात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाले तर ही लक्षवेधी लढत ठरणार आहे ,

पुणे जिल्ह्यात एकूण चार लोकसभा मतदार संघ आणि १८ विधानसभा मतदार संघ आहेत याखेरीज दोन महानगरपालिका आहेत. गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षांचे जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व राहिले तर पुण्याची जागा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे. गेल्या वर्षी तत्कालीन भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले पण त्यांच्या रिक्त जागेसाठी निवडणूक झाली नाही. दरम्यान कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली ती जागा भाजपकडे होती पण पोटनिवडणुकीत कोंग्रेस पक्षाने ती जागा खेचून आणली .

आताच्या बदलत्या राजकीय स्थितीत भाजपाच्या माजी आमदार प्रा मेधा कुलकर्णी यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे येणा-या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यासाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ,पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,माजी खासदार संजय काकडे ,पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर अशी अनेक नावे चर्च्रेत असताना बाहेरचा उमेदवार निवडणुकीसाठी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच वर्षात विधानसभा आणि महानगर्पालिकेच्या निवडणुका होणे शक्य आहे. हे लक्षात घेता उमेदवार निवडीसाठी पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे.

काही वर्षापूर्वी कोंग्रेस पक्षाचे पुणे लोकसभा मतदार संघावर वर्चस्व होते खासदार कलमाडी तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री गाङगीळ यांनी या मतदार संघाचे अनेक वर्ष नेतृत्व केले आहे. पण काळाच्या ओघात ज्याप्रमाणे राजकीय स्थित्यतरे होत गेली त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाची या मतदारसंघावरील पकड ढिली होत गेली निवडणुकीच्या दृष्टीने काही इच्छुकांनी तयारी सुरू केली असून त्यात माजी मंत्री रमेश बागवे माजी आमदार मोहन जोशी ,पक्षाचे शहर अध्यक्ष अरविद शिंदे ,माजी नगरसेवक आबा बागूल यांचा समावेश आहे.

सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणाचा जिल्ह्यातील लोकसभा , विधानसभा आणि त्यानंतर होऊ घातलेल्या महानगर पालिका निवडणुकीवर परिणाम होणार हे नक्की पण त्यासाठी लोकसभा निवडणूक महत्वाची ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणिते ही जरी भिन्न असली तरी शहरासमोरील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निवडणूक महत्वाची ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR