17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रबारामती कृषी प्रदर्शनात आकर्षण ठरला सोनेरी रंगाचा घोडा

बारामती कृषी प्रदर्शनात आकर्षण ठरला सोनेरी रंगाचा घोडा

बारामती : प्रतिनिधी
बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषक प्रदर्शनात ११ कोटीचा सोनेरी रंगाचा घोडा विशेष आकर्षण ठरला. त्याचबरोबर दीड फूट उंचीची बन्नूर मेंढी, १,५०० किलो वजनाचा कमांडो नावाचा रेडा, ३ फुटांची पोंगनूर गाय देखील आकर्षण ठरले. कृषिक २०२५ या कृषि व प्रदर्शनात महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनातील अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत. या प्रदर्शनात असणा-या विविध प्रकारचे पशू चर्चेचे विषय ठरले आहेत.

यात हैदराबादच्या नवाब हसन बिंद्रिप यांच्या सोनेरी रंगाच्या घोड्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा घोडा पाहण्यासाठी शेतक-यांची आणि अश्वप्रेमींची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे, या घोड्याची मालेगावच्या यात्रेत ११ कोटींची किंमत सांगितली होती.

त्यामुळे प्रदर्शनातील हा ११ कोटी रुपये किमतीचा घोडा चर्चेत आहे. हा घोडा ११ कोटीच्या आत आपण विकणार नसल्याचे हसन बिंद्रिप यांनी सांगितले.विशेष म्हणजे, मारवाडी पठड्याच्या हा घोडा असून, तो देशात एकमेव असल्याचा दावा नवाब यांनी केला आहे. हा घोडा ८ वर्षांचा आहे, तो त्यांनी पुष्करच्या यात्रेतून खरेदी केला आहे. त्या घोड्याचा खुराक ऋतुमानानुसार वेगवेगळा असून, त्याचे डोळे आणि शरीर यांचा रंग एकसारखा असल्याने हा घोडा अतिशय आकर्षित करत आहे. डौलदार शरीरयष्टी, दुर्मिळ सोनेरी रंग, आकर्षक डोळे असा हा घोडा या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR