28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरबारावी परीक्षार्थ्यांना फूल अन् शुभेच्छाही

बारावी परीक्षार्थ्यांना फूल अन् शुभेच्छाही

लातूर : प्रतिनिधी
फेब्रुवारी/ मार्च २०२४ इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा दि. २१ फेब्रुवारी  रोजी सुरु झाली. दयानंद कला महाविद्यालयात परीक्षेचे केंद्र असून या केंद्रावर एकूण ५७० विद्यार्थी परीक्षेसाठी देण्यात आलेले आहेत. बुधवारी परीक्षेचा पहिलाच दिवस. त्यात इंग्रजी या विषयाचा पेपर त्यामुळे विद्यार्थी थोडेसे तणावात असतात. विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त्त वातावरणात परीक्षा द्यावी यासाठी महाविद्यालयाने प्रवेशद्वार छान अश्या फुग्यांनी व रांगोळीनी सजवले होते तसेच या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पाने स्वागत व शुभेच्छा देण्याकरीता  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना विनंती केली होती. त्या अगदी वेळेवर केंद्रावर येऊन विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
जिल्हाधिकारी यांनी आपल्या मनोगतात शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी कसल्याही तणावाखाली परीक्षा देऊ नये कारण दोन वर्षात तुम्ही जी मेहनत घेतलेली असते त्यामुळे तुम्हाला हि परीक्षा अजिबात कठीण जाणार नाही. म्हणून निर्भीडपणे तणाव मुक्त वातावरणात तुम्ही परीक्षा द्याव्यात. खुप मेहनत करावी म्हणजे भविष्यात जिल्हाधिकारी होऊ शकाल. या केंद्रावर उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या वतीने खुप खुप शुभेच्छा.
दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव  रमेशजी बियाणी, उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष ललितभाई शाह यांनीही या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नियामक मंडळ सदस्य विशाल अग्रवाल व त्यांच्या पत्नी स्मिता अग्रवाल, चैतन्य भार्गव, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड व त्यांच्या पत्नी जयमाला गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा केंद्र प्रमुख अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, जिल्हा माहिती अधिकारी ताणाजी घोलप या सर्वांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.  या केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था परीक्षा विभागातील सदस्य प्रा. जिगाजी बुद्रुके, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. चंदेश्वर प्रसाद यादव, डॉ. प्रशांत दिक्षीत, डॉ. गोपाल बाहेती यांनी केली.
वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुनिल साळुंके, प्रा. डॉ. रमेश पारवे, प्रा.  डॉ. अंजली जोशी, प्रा. डॉ. प्रदिप सुर्यवंशी, प्रा. डॉ. संतोष पाटील, प्रा. डॉ. नितीन डोके, प्रा.डॉ. शिवकुमार राऊतराव व कार्यालयीन अधिक्षक संजय तिवारी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  या स्वागत कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR