बेस्ट शुगर फॅक्टरी पुरस्कार मांजरा साखर कारखान्यास जाहीर 

लातूर : प्रतिनिधी
राज्यात सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत अव्वल स्थानी असलेल्या लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यास द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट शुगर फॅक्टरी-२०२६ विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याने गेल्या ३ वर्षात  १०० टक्के उसाची तोड केवळ हार्वेस्टरद्वारे होत असून याचे जनक व कारखान्याचे चेअरमन राज्याचे  माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्याकडे जाते  देशभरात केवळ मांजरा साखर कारखाना १०० टक्के हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणारा पहिला कारखाना ठरलेला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने राज्यभरातून मांजरा साखर कारखान्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे यांच्या वतीने ७१ व्या वार्षिक परिषद व साखर एक्सपो २०२६ इंडिया या कार्यक्रमांमध्ये दि. ८ ऑगस्ट रोजी हॉटेल जे. डब्ल्यू. मेरीयट पुणे येथे मान्यवराच्या हस्ते या पुरस्काराचे शानदार सोहळ्यात वितरण करण्यात येणार आहे .
साखर उद्योगाकडे  मजुरांची कमतरता व उसाचे क्षेत्र अधिक झाल्याने मे महिन्यापर्यंत चालू ठेवावे लागत असे. कधी ऊस तोड कामगार मध्येच निघून जायचे त्यामुळे कारखान्यास उसाचे गाळप उशिरा होऊ लागले. त्यानंतर  माजी मंत्री सहकार, महर्षी दिलीपराव देशमुख यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मदतीने ऊस तोडणीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व होतकरू तरुणांना ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर देण्यात आले. त्यात तोडणी यशस्वी झाली ऊस उत्पादक शेतक-यांची ऊस तोड लवकर होऊ लागली. त्यानंतर जिल्हा बँकेकडून बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी शेतक-यांना  हार्वेस्टर कर्ज योजना सुरू केली.
त्यात ग्रामीण भागातील अनेक शेतक-यांनी स्वत: बँकेकडून  कर्ज काढून  हार्वेस्टर खरेदी केले. त्यातुन बहुतांश हार्वेस्टर साखर कारखान्याला भाड्याने लावली. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याची स्वत: ची २५ हार्वेस्टर व कारखान्याने हमीवर दिलेले ५५ हार्वेस्टर, असे एकूण ८० हार्वेस्टरद्वारे १०० टक्के  ऊस तोडणी आत्ताच झालेल्या गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये झालेली आहे. त्यामुळे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर हा देशात १०० टक्के ऊस तोडणी हार्वेस्टरद्वारे होणारा केवळ राज्यातील नाही तर देशातील  पहिला साखर कारखाना ठरला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14

Latest news