22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयब्रिटनच्या १५ शहरांत दंगलीचे लोण; पोलिसांवर हल्ले; अनेक स्टेशनला आग

ब्रिटनच्या १५ शहरांत दंगलीचे लोण; पोलिसांवर हल्ले; अनेक स्टेशनला आग

साऊथपोर्ट : वृत्तसंस्था
ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुलांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे दोन समुदायात तेढ निर्माण झाली आहे. दोन्ही समुदाय एकमेकांसमोर आले आहेत. शनिवारी ३ ऑगस्ट रोजी तर हिंसक जमावाने पोलिसांवर दगड, विटांचा मारा केला. अनेक शहरात पोलीस स्टेशनला आग लावण्याच्या घटना वाढल्या. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. यामध्ये तीन पोलीस जखमी झाले.

इंग्लंडमधील १५ शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनता रस्त्यावर उतरली आहे. तर काही आंदोलकांनी हिंसक प्रदर्शन केले आहे. इंग्लंडच्या साऊथपोर्ट या भागात सर्वाधिक हिंसा झाली. काही दिवसांपूर्वी १७ वर्षांच्या तरुणाने ३ लहान मुलांना चाकुने भोसकल्याची घटना घडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. चाकू भोसकणारा आरोपी हा इस्लामिक जिहादी गटाशी संबंधित असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्यानंतर हिंसा भडकली.

साऊथ पोर्टमधील सुंदरलँडमध्ये नागरिकांनी उग्र प्रदर्शन केले. आंदोलकांनी पोलिसांना आणि पोलीस ठाण्यांना लक्ष्य केल्यानंतर लाठीमार करण्यात आला. आंदोलकांच्या हाती ब्रिटनचा ध्वज होता. आंदोलकांना पुढे जाण्यापासून मज्जाव केल्यानंतर आंदोलक हिंसक झाले होते.

इंग्लंडमधील लिव्हरपूल जवळील साऊथपोर्ट भागात २९ जुलै रोजी एका १७ वर्षीय मुलाने लोकांवर चाकू हल्ला चढवला. त्याने तीन लहान मुलांना भोसकले. या हल्ल्यात लिस डेसिल्वा अगुइर (९ वर्ष), एल्सी डॉट स्टॅनकॉम्ब (७ वर्ष) आणि बेबे किंग (६ वर्ष) यांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR