25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयब्रुनोईच्या सुलतानाकडे सोन्याचे बेसिन, विमान आणि राजवाडा!

ब्रुनोईच्या सुलतानाकडे सोन्याचे बेसिन, विमान आणि राजवाडा!

बंदर शेरी बेगवान : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रुनोईच्या दौ-यावर आहेत या पार्श्वभूमीवर येथील सुलतानाच्या सोनेरी लाईफस्टाईची चर्चा होत आहे. ब्रुनोईच्या सुलतानाचे नाव हसनल बोल्किया आहे. त्यांचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होतो. ब्रुनेईला १९८४ मध्ये ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळाले. सुल्तान उमर अली सैफुद्दीन-३ हे ५ ऑक्टोबर १९६७ रोजी ब्रुनेईचे राजा म्हणून जाहीर झाले. आता ते सलग ५९ वर्षापासून ब्रुनोईच्या गादीचे सुलतान आहेत.

आपल्या ऐषोआराम आणि चैनीच्या जीवनशैलीमुळे ते जगात प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांचा राजवाडा अनेक एकरवर पसरला आहे. त्यातील अनेक वस्तू सोन्याचा मुलामा दिलेल्या आहेत. त्यांच्याकडे एक चार्टर्ड फ्लाईट देखील आहे. या खाजगी विमानातील अनेक वस्तू सोन्याचा मुलामा दिलेल्या आहेत. जगातील सगळ्यात जादा चैनीचे आयुष्य ते जगत आहे. त्यांच्याकडे लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. सुलतानाच्या महालाची कहाणी अनोखी आहे. त्यांच्या संपत्तीबाबत अनेक वदंता आहेत. तरीपण त्यांच्याकडे ३० बिलियन डॉलरची संपत्ती आहे.

सुल्तान हसनल यांना सोन्याचे इतके वेड आहे की त्यांनी घरात सोन्याचे बेसिन लावले आहे. कार आणि विमानाला देखील सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यांनी एकदा त्यांच्या कन्येला विमानच बर्थडे गिफ्ट म्हणून दिले होते. इतकेच नव्हे तर त्याचे कपडे देखील सोनेरी छटा असलेले आहेत.

त्यांच्या राजवाड्यात १७०० खोल्या आहेत. तसेच २५७ वॉशरुम आहेत. कारसाठी ११० गॅरेज आहेत. राजवाड्याच्या काही भिंतींना देखील सोन्याचा मुलामा लावला आहे. सुल्तान केस कापायला विमानाने लंडनला जातात. त्याचा खर्च २० हजार डॉलर आहे.

ब्रुनोई या देशाची लोकसंख्या ८० टक्के मुस्लीम आहे. ब्रुनोईला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विरोधी पक्षासाठी स्थानच नाही. येथे कोणतीही सिव्हील सोसायटी अस्तित्वात नाही. येथे १९६२ पासून घोषित केलेल्या आपात्कालिन सरकारचे कामकाज सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR