21.2 C
Latur
Thursday, October 24, 2024
Homeमहाराष्ट्रभांडुपमध्ये राज ठाकरेंना धक्का

भांडुपमध्ये राज ठाकरेंना धक्का

प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम 

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत मनसेला रामराम ठोकला आहे. मी मनसे स्थापन झाल्यापासून मनसे सोबत काम करत आहे. ज्या जबाबदा-या मला दिल्या, अनेक कामे दिली, निवडणुका लढवल्या.मी निवडणूक लढवायची की नाही हे अजून ठरवले नाही, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडत असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, मनसेने पुण्यात अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही, त्याबद्दल काय घडले नाही. मी निवडणूक लढवायची की नाही हे अजून ठरवले नाही. मी नाराज नाही, कोणताही वाद नाही, तसेच रागात घेतलेला निर्णय नाही. मनसे शिवाजीनगर लढणार नाही असे झाले नाही, पण मी पक्षावर बोलणार नाही.

मला कुठल्याही पक्षाची ऑफर नाही, पण निवडणूक फॉर्म आणला आहे,त्यामुळे लढू शकतो, असे म्हणत प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळेंनी मनसेला रामराम ठोकला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR