24.4 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

भाजपकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते नितेश राणे कायम अवास्तव बोलतात. भाजपच्या नेत्यांनी जो अजेंडा त्यांना दिला आहे, त्यानुसार त्यांचे बोलणे सुरू आहे. भाजप निवडणूक हरत आहे, निवडणूक जिंकू शकत नाही, म्हणून मतांचे पोलरायझेशन करण्यासाठी, धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर केली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजप सरकारवर टीका करत म्हणाले, भारतीय जनता पक्षाला या राज्यात दंगली घडवायच्या आहेत. हे राज्य अस्थिर करायचे आहे. भांडणे लावायची आहेत. निष्पाप लोकांचा जीव घ्यायचा आहे. ही भाजपची सत्तेसाठीची नीती आहे. आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न सुरू आहे. किंबहुना मृताच्या टाळूवरील लोणी खाता येईल, अशीच भाजपची नीती आहे, तेच नितेश राणे यांच्या मुखातून बाहेर येत आहे.

ज्या नितेश राणेंनी आरएसएसवर काँग्रेसमध्ये असताना टीका केली. हे हाफ चड्डीवाले आरक्षण देऊ शकत नाहीत, हे जातीवादी आहते, असे ते म्हणाले होते. मात्र आता सत्तेच्या खुर्चीवर असताना ते असे वक्तव्य करत असतील आणि दोन धर्मांत आग लावण्याचे काम करत असतील तर सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा.

तसेच ओबीसी आरक्षणाविषयी बोलताना, शासनाची भूमिका त्यासंदर्भात स्पष्ट होत नाही, याचा अर्थ असा लक्ष्मण हाके यांनी त्यांची भूमिका काय आहे, ते मांडले असावे. त्यांचे मत वेगळे असू शकते. मात्र, शरद पवारांची भूमिका आम्हाला तशी वाटत नाही. मुख्यमंत्री समाजाला बनविण्याचे काम करत आहेत. जरांगे पाटलांचा मोर्चा होता तो मुंबईला अडविण्यात आला. तेव्हा त्यांना काय लिहून देण्यात आले, त्यांनी नंतर माघार घेतली. त्यांच्या काय मागण्या मान्य केल्या, अशी बनवाबनवी एकनाथ शिंदे समाजाची करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमचे आव्हान आहे, की त्यांनी जे काही लिहून दिले त्याची पूर्तता करावी. पवार साहेबांच्या संदर्भात मात्र ते विधान मला योग्य वाटत नसल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

पराभव पुढे दिसत असल्याने हा रडीचा डाव
महाराष्ट्रात निवडणुका वेळेवर व्हाव्यात, ही सगळ्यांची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये जर भाजपला निवडणुका नको असतील तर दंगली घडवतील आणि राज्यपालांच्या मार्फत अहवाल देतील, महाराष्ट्र अस्थिर आहे, म्हणून निवडणुका पुढे ढकला, असेही ते करू शकतात. पराभव पुढे दिसत असल्याने हा रडीचा डाव खेळला जातो आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR