लातूर : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून दैनंदिन भाजीपाल्याचे दर आटोक्यात येत असतानाच बाजारपेठेत येणा-या भाज्यांची आवक घटल्यामुळे काही भाज्यांच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. शहरातील महात्मा फुले बाजार समितीत भेंडी, फ्लॉवर, कारले, तोंडली, हिरवी मिरची या भाज्यांच्या दरात मागील पाच ते सहा दिवसांत १० ते २० रुपयांपर्यंतची वाढ झाली असल्यामुळे गृहिणींचे बजेट पुन्हा कोलमडले आहे.
शहरातील बाजार समितीत ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असते. काही महिन्यांपूर्वी भाज्यांचे दर शंभरी पार पोहचले होते. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली होती. परंतु काही दिवसांपूर्वी काही भाज्यांची आवक वाढल्यामुळे त्यांच्या दरातही घसरण होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. शहरातील महात्मा फुले बाजार समितीत शनिवारी झालेली भाजीपाल्याची आवकही कमी प्रमाणात झाली असल्याची दिसून आली.
यात वागें १२ किंव्टल आवक होवून ३२० रूपयांचा दर मिळाला, भेंडी ६ किंव्टल आवक होवून २४० रूपयांचा दर मिळाला, पत्ता गोभी ४ कंिव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, फुल गोभी ४५ किंव्टल आवक होवून २२० रूपयांचा दर मिळाला, टमाटे गावराण ७१ किंव्टल आवक होवून २४० रूपयांचा दर मिळाला, वैशाली टमाटे १०९ किंव्टल आवक होवून २२० रूपयांचा दर मिळाला, गवार १६ किंव्टल आवक होवून ५०० रूपयांचा दर मिळाला, भोपळा ३ किंव्टल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला, हिरवी मिरची ४५ किंव्टल आवक होवून ३२० रूपयांचा दर मिळाला, वैशाली मिरची ३६ किंव्टल आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला, वरणा ३३ किंव्टल आवक होवून ३२० रूपयांचा दर मिळाला, दोडका १४ किंव्टल आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला,
फुल गोभी ४६ किंव्टल आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला, पालक १ किंव्टल आवक होवून २०० रूपयांचा दर मिळाला, शेपू ३ किंव्टल आवक होवून २०० रूपयांचा दर मिळाला, कोथिंबीर ३४ किंव्टल आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला, वटाना ४ किंव्टल आवक होवून ४४० रूपयांचा दर मिळाला, मेथी ३६ किंव्टल आवक होवून १००० रूपयांचा दर मिळाला, कांदापात ३ किंव्टल आवक होवून १००० रूपयांचा दर मिळाला, लिंबू १७ किंव्टल आवक होवून ३४० रूपयांचा दर मिळाला, काकडी १५ किंव्टल आवक होवून २४० रूपयांचा दर मिळाला, कारले १६ किंव्टल आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला, बिट ९ किंव्टल आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला असून बाजारात ५७६ किंव्टलची आवक झाली आहे.