26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeलातूरभातखेडा येथील माने यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

भातखेडा येथील माने यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील भातखेडा येथील येथील प्राथमिक शाळेस रीड लातूरच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आमदार धीरज विलासराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, रीड लातूरच्या संस्थापिका श्रीमती दीपशिखाताई देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शिक्षक नागेश माने यांनी स्वीकारला.
भातखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे मितभाषी असलेले नागेश माने यांनी प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेविरोधी अभियान आणि साधना वाचनसंस्कृती अभियान राबविण्यात पुढाकार घेतला. चाकूर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे ते अभ्यासू संचालक आहेत.  या पुरस्कार वितरण प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती मधुमालती पांचाळ, संदीप भोसले, सुनील चिटे, कुलदीप पाटील, रामदास वंगवाड, श्रीमती विजयमाला सावळे, श्रीमती पार्वता तोटावाड यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल समस्त ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR