नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. गुरुवारी रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने वापरलेल्या ड्रोनच्या अवशेषांची प्राथमिक तपासणी केली. यामध्ये हे ड्रोन तुर्की-मूळच्या सोंगर सशस्त्र ड्रोन प्रणालीचे असल्याचे समोर आले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, तुर्की सल्लागारांनी पाकिस्तानी सैन्याला भारतावर ड्रोन हल्ले करण्यात मदत केली होती. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत दोन तुर्की ड्रोन ऑपरेटर देखील मारले गेल्याची माहिती समोर आली आहे.
भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये एकूण ३५० हून अधिक तुर्की ड्रोनचा वापर करण्यात आला. पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेले तुर्की लष्करी कर्मचारी भारताविरुद्ध ड्रोन हल्ल्यांमध्ये सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे.