औसा : प्रतिनिधी
सोयाबीनचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर १९किं्वटल वरून प्रति हेक्टर ३०किं्वटल पर्यंत वाढविण्यासाठी आणि त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील वातावरणाला पूरक ठरेल अशा सोयाबीन बियाण्यांच्या जाती विकसित करण्यासंदर्भात भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि इंडो सोयाबीन डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद संचालित भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्था इंदूर येथे (दि.१४) जून रोजी झालेल्या सोयाबीन परिषदेत हा करार इंडो सोयाबीन डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी डॉ कुंवर हरेंद्र सिंहजी, डि.एन.पाठक, शिवाजी जगताप, एम. पी. शर्मा, शुभ्रा देशपांडे, पूनम कांचन आदी उपस्थित होते. दरवर्षी १ दिवस सोयाबीन दिन म्हणून साजरा कारण्यासंदर्भातही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.सोयाबीनपासून तेलाव्यतिरिक्त पनीर, बिस्कीट, उपमा, चिप्स व
प्रोटीनसारखे अनेक बायप्रोडक्ट्स तयार करता येतात.
यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन बायप्रोडक्ट्स निर्मितीतीबाबत माहिती घेतली. शेतक-याचे उत्पन्न वाढवायचे असेल तर सोयाबीनचे उत्पादन वाढणे गरजेचे आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-याच्या आर्थिक उन्नतीसाठी इंडो सोयाबीन डेव्हलपमेंट असोसिएशन, कउअफ सारख्या नामवंत संस्थेसोबत मिळून भरीव कार्य करेल अशी ग्वाही यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.