15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeलातूरभारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

लातूर : प्रतिनिधी
भारतीय संविधान दिन लातूर शहर व परिसरात दि. २६ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विविध पक्ष, संघटना व नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आहे. तसेच संविधान स्तंभासमोर संविधानाच्या उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन करण्यात आहे. रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. संपूर्ण दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल होती.

काँग्रेस पक्षातर्फे संविधान उद्देशिकेचे वाचन
लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने संविधान दिवस दि. २६ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड.किरण जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व उपस्थित सर्व मान्यवरांनी अभिवादन केले त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले.

यावेळी संभाजी सुळ, गोरोबा लोखंडे, पृथ्वीराज शिरसाठ, दगडुअप्पा मिटकरी, रविशंकर जाधव, प्रा. सुधीर आणवले, इम्रान सय्यद, प्रवीण सूर्यवंशी, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, प्रा. प्रवीण कांबळे, अ‍ॅड. शरद देशमुख, सुपर्ण जगताप, आसिफ बागवान, महेश काळे, पंडित कावळे, युनूस मोमीन, अ‍ॅड. अंगदराव गायकवाड, ख्वॉजामियॉ शेख, अभिजित इगे, बालाजी झिपरे, विष्णुदास धायगुडे, अभिषेक पतंगे, पिराजी साठे, कुणाल वागज, बब्रुवान गायकवाड ,करीम तांबोळी, प्रमोद जोशी, युनूस शेख, संजय सुरवसे, किरण बनसोडे, ख्वॉजापाशा शेख, अमोल गायकवाड, संदीपान सूर्यवंशी, कमलताई शहापुरे, लक्ष्मीताई कांबळे, सुमन चव्हाण, सुलेखाताई कारेपूरकर, भाऊसाहेब भडिकर, अशोक सूर्यवंशी, पवनकुमार गायकवाड, आकाश मगर, गौतम मुळे, राजू पुंड, राजाभाऊ गायकवाड, पंकज सोनवणे, फैसलखान कायमखानी यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांतर्फे संविधान दिन साजरा
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत चिकटे, मोहन माने, प्रा. अनंत लांडगे, रमेश शृंगारे, अशोक कांबळे, व्ही. के. आचार्य, प्रा. विजय शृंगारे, प्राचार्य एस. टी. मस्के, एस. एस. धसवाडीकर, चौधरी, मोहन कांबळे सेलूकर यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR