18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारत-बांगलादेश सीमेवर शेतक-यांमध्ये चकमक

भारत-बांगलादेश सीमेवर शेतक-यांमध्ये चकमक

मालदा : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्याला लागून असलेल्या बांगलादेशाच्या सुखदेव सीमेवर भारत आणि बांग्लादेशमधील शेतक-यांमध्ये जोरदार चकमक उडाली. दरम्यान, काही लोक बांगलादेशची सीमा ओलांडून घुसखोरी करीत होते. त्यावेळी सुखदेवपुरच्या गावक-यांनी बांगलादेशी नागरिकांचा पाठलाग केला, तेव्हा दोन्ही गटात मोठी दगडफेक झाली. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बीएएसएफने अश्रुधरÞांच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

शुक्रवारी रात्रीपासून बांगलादेश आणि भारत सीमेवर मोठा तणाव आहे. आता स्थिती तणावाची असली तरी नियंत्रणात आहे. दोन्ही बाजूंच्या शेतक-यात मोठी चकमक उडाली आहे. बांगलादेशातील सीमावर्ती भागातील शेतकरी पळून गेले आहेत. याआधी बीजीबीने सीमांवर काटेरी कुंपण घालायला वारंवार विरोध केला होता. ही घटना घडली तेव्हा काही भारतीय शेतकरी नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असणा-या शेतात काम करण्यासाठी पुढे गेले होते.

परस्परांवर दगडफेकीचा आरोप
भारतीय शेतक-यांनी बांगलादेशच्या शेतक-यांवर पिक चोरल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे दोन्ही देशांच्या शेतक-यांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूने मोठा जमाव जमल्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करणे सुरु झाले. त्यानंतर एकमेकांवर दगड फेक केल्याचा आरोप दोन्ही गटांनी केला आहे. सीमेवर अनेक भागात तारांचे कुंपण नसल्याने भारतीय शेतकरी दूरपर्यंत सीमेपलिकडील आपल्या शेतात जात असतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR