39.1 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeलातूरभालकी ते वलांडी नवीन बस सुरू करा

भालकी ते वलांडी नवीन बस सुरू करा

मेहकर : वार्ताहर 
भालकी डेपोची भालकी,-वलांडी या मार्गावर नवीन बससेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी मेहकर परिसरातील प्रवाशांनी केली आहे. या मार्गावर बस सेवा नसल्याने प्रवाशांसह  विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
सायगाव सर्कलमधील सायगाव, मेहकर, बसवनवाडी, बोळेगाव, नारदा, संगम तांडा, आटरगा, गुंजर्गा, आळवाई, हरेवाडी, येलमवाडी, तुगाव हा, वांजरखेडा कोंगळी, श्री माळी माणकेश्वर या अनेक गावांतील शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पुरुष महिला प्रवाशांची मागणी  अनेक दिवसाची ही मागणी प्रलंबित आहे. या परिसरात सकाळी ८ वाजल्यानंतर तालुका भालकी बसवकल्याण बिदर हुलसुर या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवाशांना विविध कार्यालयांच्या वेळेत तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही डेपोची एसटी बस नाही. सकाळी आठ नंतर डायरेक्ट १०.३० वाजता भालकी डेपोची भालकी देवणी ही एसटी बस आहे. बसवकल्याण डेपोची १०.३० ला वलांडी बसवकल्याण ही बस आहे. भालकी डेपोची सकाळी ११ वाजता तुगाव हा ते भालकी एसटी बस आहे नंतर भालकी डेपोची वलांडी भालकी ही बस ११ वाजता आहे. या बसेस साडेदहाच्या नंतर ११ या वेळेतच आहेत. नंतरच्या वेळेत कुठलीच बस  नसल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांची व महिलांची  गैरसोय होत असते.
भालकी डेपोचे डेपो मॅनेजर भद्रेपा हुडगे यांना या भागातील समस्येबद्दल पत्रकार दत्तात्रय साबणे व पत्रकार दत्तात्रय स्वामी यांनी या भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे म्हणून डेपो मॅनेजरना भेटून ही माहिती  दिली आहे. तेव्हा भालकी डेपोच्या व्यवस्थापकांनी या भागातील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन भालकी डेपोची सकाळी वलांडी ते आळवाई मेहकर सायगाव केसर जवळगा या मुख्य मार्गाने भालकीला जाण्यासाठी वलांडीहून सकाळी दररोज ८.३० वाजता नवीन एसटी बस सुरू करावी अशी मागणी या भागातील विद्यार्थ्यासह पुरुष व महिलंच्यावतीने करण्यात आली आहे तसेच या भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी भालकी डेपोची आणखीन एक बस भालकी ते वलांडीनंतर वलांडी ते केसर जवळगा शटल गाडी फक्त केसर जवळगा वलांडी दिवसभर चार ते पाच फे-या कराव्यात या एसटीला भरपूर प्रवासी मिळतील तेव्हा ही शटल एसटी सुरू झाल्यास जवळगा ते वलांडी या भागातील कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणा-या दळणवळण करणा-या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे . ही शटल एसटी बस सुरू करण्यात यावी व दिवसभरात कमीत कमी पाच फे-या सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR