36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रभिडेंना चावणा-या कुत्र्याची सरकारने एसआयटी चौकशी केली पाहिजे

भिडेंना चावणा-या कुत्र्याची सरकारने एसआयटी चौकशी केली पाहिजे

चंद्रपूर : प्रतिनिधी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी ऊर्फ ​​मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कुत्रा चावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. यावरूनच आता काँग्रेस विधिमंडळ नेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. ‘त्या कुत्र्याला इतकी काय दुर्बुध्दी सुचली, कुणाला चावावे कळले नाही. याचे वाईट वाटते. त्यामुळे भिडे यांना चावणा-या कुत्र्याची एसआयटी चौकशी सरकारने केली पाहिजे’, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते वडेट्टीवार चंद्रपुरात शासकीय विश्रामगृहावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘दिवंगत लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका होत्या. छान गायच्या. जनतेचा त्यांना प्रतिसाद होता. हे सर्व आम्ही मान्य करतो. मात्र, सामाजिक योगदानाचे काय? असाही प्रश्न उपस्थित केला. मुंबईतील पेडर रस्त्यावरच्या उड्डाणपुलाला त्यांनी वैयक्तिक कारणासाठी विरोध केला होता. विशेष म्हणजे, तेव्हा लता मंगेशकर यांनी देश सोडण्याची धमकीही दिली होती. मंगेशकर यांचे सामाजिक योगदान नाही, या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्याच्या घटनेवर वडेट्टीवार यांनी म्हटले की, ‘कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. मात्र, या प्रामाणिक प्राण्याने भिडे गुरुजी यांचा इतका का राग धरला याची देखील चौकशी झाली पाहिजे’.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR