15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeलातूरमनं जोडण्याची परंपरा वाचनातून जोपासली जाते

मनं जोडण्याची परंपरा वाचनातून जोपासली जाते

लातूर : प्रतिनिधी
माणसानं आपलं जगणं सुंदर करायचे असेल तर आहे त्याचा उत्सव करावा, जगणं सुकर करायचे तर चांगलं वाचन महत्वाचे आहे असे सांगून, माणसांची मनं जोडण्याची परंपरा वाचनातून जोपासली जाते, असे मत प्रसिध्द साहित्यिक मोहिब कादरी यांनी व्यक्त केले.
माळकोंडजी ता. औसा येथील गोपाळबुवा सार्वजनिक ग्रंथालयात आयोजित दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश विभूते हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी राम गारकर हे होते. मंचावर सत्कारमूर्ती जिल्हा सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष डॉ. ब्रिजमोहन झंवर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रचना पूरी, आलमलाच्या विश्­वेश्­वर फार्मसीचे प्राचार्य डॉ. विश्­वेश्­वर धाराशिवे, साहित्यिक द. मा. माने यांची उपस्थिती होती.
सामान्य अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी घराण्यात ज्ञानाचा वारसा नसताना एका शिक्षकाने शालेय जीवना वाचनाची गोडी लावली आणि आज मी साहित्य क्षेत्रात भर्रा­या घेतो आहे असे सांगत वाचनामुळे माणसांला कशा प्रकारे चांगले वर्तन,आचरण आणि संभाषण करता येते यावर मोहिब कादरी यांनी भाष्य केले. माणसाची जात, धर्म यापेक्षा तो चांगला माणूस होणे आवश्यक आहे,हे कसब वाचनामुळे साध्य होते असे स्वानुभव कथन करुन मोहिब कादरी यांनी वाचनकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी गारकर यांनी आपण आपल्या मुलींच्या लग्नात व-हाडीं मित्रांना शाली, पटके बांधण्यापेक्षा, हजारोंचे ग्रंथ भेट दिले असे सांगून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माणसाला ग्रंथालयाची निकड भासत आहे, ग्रंंथवाचनामुळे माणूस समृध्द होतो,समाजाच्या समृध्दीसाठी ,विकासासाठी वाचनालयाची चळवळ गतिमान होणे आवश्यक आहे. वाचनामुळेच काही तरी करण्याची प्रेरणा मिळते,मला स्पर्धा परीक्षेची गोडी लागली आणि वरिष्ठ पदावर जाता आले,एकूणच माणूस कळण्यासाठी पुस्तकाशिवाय तरणोपाय नाही असेही राम गारकर यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. ब्रिजमोहन झंवर म्हणाले, माळकोंडजी हे अडवळणाला असले तरी इथल्या ग्रंथालयामुळे या छोट्याश्या गावचे सुमारे तीनशे शासकीय कर्मचारी झाले, एकार्थाने गोपाळबुवा ग्रंथालयाने गावाला दिशा देण्याचे काम केल्याचे कौतुक करुन प्रत्येकाने आपले संभाषण मराठीतून करावे असे आवाहन केले. मुख्याध्यापिका रचना पूरी या सुसज्ज ग्रंथालयामुळे स्पर्धा परीक्षार्थींची पिढीच तयार होवून गावाला समृध्दी आली, ग्रंथालयाचा अधिकाधिक गावर्क­यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रारंभी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते सामूहिक पूजन  करुन अभिवादन करण्यात आले, मोहिब कादरी यांच्या हस्ते दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळबुवा सार्वजनिक ग्रंथालयाचे सचिव ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे यांनी केले. सूत्रसंचालन नारायण अडसुळे व बाळ होळीकर यांनी केले. ग्रंथालय संचालक पल्लवी अडसुळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला असंख्य वाचक हजर होते. या कार्यक्रमासाठी सहसचिव ज्ञानोबा क्षीरसागर, ग्रंथपाल शिवंिलग अडसुळे, लिपिक रामंिलग अडसुळे, संचालक मारुती बरडे, आनंद अडसुळे, शिपाई इंदु बनसोडे, काका बनसोडे, प्रकाश कांबळे, नारायण कांबळे, वसुुधा मोरे, लक्ष्मण वाघमारे, दिलीप भारती, विकास साठे, आनंद कांबळे, ज्ञानोबा कांबळे, विकास पांचाळ, निकीता अडसुळे, रामदास कांबळे आंिदनी सहकार्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR