23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरमनपाच्या पोलीओ लसीकरणास प्रतिसाद

मनपाच्या पोलीओ लसीकरणास प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरामध्ये रविवार दि. ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. ० ते ५ वर्षाच्या आतील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेस शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला. महानगरपालिकेने पोलीओ लसीकरणासाठी शहराच्या विविध ठिकाणी, शहराच्या बाहेरील भागातील तुरळक वसाहत, बसस्थानक, बसचे थांबे इ. ठिकाणी बुथची व मोबाईल टिमची सोय केली होती. लातूर शहरात ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांची संख्­या अंदाजीत ४५००० एवढी आहे. या सर्वांना पोलीओचा डोस देण्यात येणार आहे.

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रसुतीगृहात, विविध मंगल कार्यालयातील विवाह समारंभात, बस थांब्यावर, विट भट्ट्यांवर, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे बालकांना पोलीओ डोस पाजण्यात आला. ही मोहीम यशस्वी करण्याकरीता डॉ. महेश पाटील, डॉ. प्रियंका टीळे, आरोग्य सहायक पार्श्वनाथ पाटील यांच्यासह पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी लातूर महानगरपालिका कार्यालय, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय येथील अंगणवाडी कर्मर्चा­यांची,तसेच विवीध खाजगी शाळांच्­या शिक्षकांची बुथप्रमुख म्­हणून नियुक्­ती करण्­यात आली आहे. तसेच शासकीय नर्सिंग स्­कूल, बाभळगाव, महालींग स्वामी नर्सींग स्कूल, न्यु व्हीजन नर्सींग स्कूल, इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल, महाराष्­ट्र नर्सिंग स्­कुल, वेदांत नर्सिंग स्कूल, स्­वामी विवेकानंद नर्सिंग स्­कुल, एम.आय.टी. नर्सिंग विद्यालय इ. नर्सिंग कॉलेजच्या ए एन एम, जी.एन.एम. स्टूडंटचा सहभाग घेण्यात येत आहे. तसेच विविध शाळा/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR