18.3 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंनी घेतली मुस्लिम धर्मगुरूंची भेट;चर्चांना उधाण

मनोज जरांगेंनी घेतली मुस्लिम धर्मगुरूंची भेट;चर्चांना उधाण

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
एका बाजूला महायुती आणि महाविकास आघाडीसह परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी तसेच अन्य पक्षांमध्ये जागावाटप, उमेदवारी याद्या यांवर भर दिला जात असताना आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतल्याचे समजते.

मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन रात्री उशिरा मुस्लिम धर्मगुरू तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनोज जरांगे पाटील निवडणुकीबाबत भूमिका जाहीर करणार आहेत. थेट निवडणुकीत सहभागी व्हायचे की पाडायचे? याचा निर्णय होणार आहे. तत्पूर्वी, मनोज जरांगे यांनी मुस्लिम धर्मगुरूशी केलेल्या चर्चेला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुस्लिम धर्मगुरूंनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे
वेगवेगळ्या चर्चा होणारच. राजकीय, सामाजिक मुद्यांवर चर्चा झाली. सज्जाद नोमानी हे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांच्या समाजात त्यांचे एक वेगळे वजन आहे. अशा माणसाला भेटायला गेल्यानंतर त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत. त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यांना दोन-तीन दिवसांचा वेळ हवा आहे. दोन-तीन दिवसांत ते काय निर्णय घेणार हे लक्षात येईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR