जालना : प्रतिनिधी
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दोन मोठे निर्णय जाहीर केले. मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी बीडच्या नारायणगड येथे होणारी सभा तुर्त रद्द केली आहे. या सभेच्या आधी ४ जूनपासून मनोज जरांगे पाटील उपोषण करणार होते. परंतु आता सभा रद्द झाल्यामुळे उपोषणाची नवीन तारीख जाहीर करण्याचा दुसरा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. सभा पुढे ढकल्यामुळे आता ४ जूनपूर्वी उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
येत्या ८ जून रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमधील नारायणगड येथे सभा होणार होती. त्यासाठी ४०० एकर मैदानावर तयारी सुरु होती. सभेला लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार होते. राज्य सरकारला धडकी भरवणारी ही सभा असेल, असा दावा आंदोलकांकडून करण्यात येत होता. मात्र पाणी टंचाईमुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे.