33 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आंदोलकांचा रास्ता रोको

मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

३ तासांपासून लातूर-बीड महामार्गावरील वाहतूक खोळंबली

बीड : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज (गुरुवार) सकाळपासून मराठा समाजाने लातूर- बीड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले आहे. परिणामी लातूर-बीड महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान दुसरीकडे बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या आंदोलकाची तब्येत ढासळल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षण आणि सगेसोय-याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत आज लातूर जिल्ह्यातील मराठा समाज लातूर-बीड महामार्गावर आला. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावर लांबच्या लांब रांगा लागल्या. सुमारे अडीच तासांपाूसन सुरू असलेल्या या आंदोलनामुळे लातूर-बीड महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.

मराठा बांधवाची बार्शीत तब्येत खालावली
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मराठा आरक्षणासाठी सलग सहाव्या दिवशी मराठा बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणकर्ते आनंद काशीद या मराठा बांधवाची तब्येत खालावली. आनंद काशीद यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला. काशीद यांच्या आंदोलनस्थळी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांनी भेट दिली होती मात्र काशीद हे उपोषणावर ठाम राहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR