19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरमराठा आरक्षणासाठी विनायकराव पाटील जलसमाधी घेणार 

मराठा आरक्षणासाठी विनायकराव पाटील जलसमाधी घेणार 

लातूर : प्रतिनिधी
हैदराबाद गॅझेटीअर स्विकारुन घटनेचे ३७१ कलमानुसार मराठा समाजाला हक्काचे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील कवठेकर हे दि. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी उमरगा तालुक्यातील कवठा येथे हजारो मराठा तरुणांना एकत्र करुन गणरायासोबत जलसमाधी घेऊन देहत्याग करणार आहेत.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्रामध्ये बिनशर्त सामील झालेल्या मराठवाड्यातील मराठ्यांची छळवणूक करु नका, मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, हैदराबाद गॅझेटीअर स्विकारुन घटनेच्या ३७१ कलमानूसार मराठ्यांना मराठ्यांच्या हक्काचे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या. अन्यथा दि. १७ सप्टेंबर रोजी देहत्याग करण्याचा निर्णय विनायकराव पाटील यांनी घेतला आहे. हैदराबाद गॅझेटीअरमध्ये लातूर व उस्मानाबाद या दोन्ही २ लाख ५ हजार म्हणजेच एकुण लोकसंख्येच्या ३८ टक्के कुणबी मराठा आहेत.
आतापर्यंत शिंदे समितीच्या माध्यमातून सापडलेल्या कुणबी नोंदी उस्मानाबाद ३५१९, लातूर ९८४. हैदराबाद गॅझेटीअरच्या मराठा कुणबी नोंदीची संख्या आणि आताच्या शिंदे समितीच्या माध्यमातून सापडलेल्या कुणबी नोंदीच्या संख्येत एवढी मोठी तफावत कशी आली, असा प्रश्न विनायराव पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने विनायकराव पाटील यांना जलसमाधी घेऊन देहत्याग करण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे सांगण्यात आले. परंतू, मराठा समाजाला आरक्षण द्यायला, सरकारला भाग पाडा, मी माझा निर्णय बदलणार नाही, असे विनायकराव पाटील यांनी प्रशासनाला कळविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR