राजकारणी, साहित्यिक या वादावर पडदा पडावा : पवार
नवी दिल्ली : मराठी माणूस झेंडा अटकेपार फडकवणारा आहे. तो दिल्लीत दिसतो, गुजरातमध्ये दिसतो. अखिल मराठी साहित्यिकांसह सगळ््यांनी पाठपुरावा केल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यासाठी नरेंद्र मोदींबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. मराठेशाहीने आपला झेंडा अटेकपार फÞडकवला, याचा मराठी साहित्यिकांना सार्थ अभिमान आहे, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार म्हणाले.
प्रसिद्ध मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर या साहित्यिकांनी देशपातळीवर ओळख निर्माण केली. मराठी भाषेची पताका नारायण सुर्वे यांच्यासारख्या कवींनी तर गावकुसाबाहेरील जगणे अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यात आणले. संतांनी मराठी साहित्य समृद्ध केले, असे सांगत साहित्य आणि राजकीय नेते परस्परांना पूरक असून राजकारणात काम करणा-यांनी साहित्य क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे या वादावर पडदा पडेल, अशी अपेक्षा आहे, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार म्हणाले.
१९५४ साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी संमेलनाचे उद्घाटन केले होते. ते संमेलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगीळ यांचे फार मोठे योगदान होते. यानंतर ७० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत संमेलनाचे उद्घाटन होत आहे, याचा आनंद आहे, असे शरद पवार म्हणाले.