22.6 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रमला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही

मला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही

यवतमाळ : प्रतिनिधी
राज ठाकरे यांनी यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्यासाठी एक प्रचार सभा घेतली. यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीसह महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल करत मला सत्तेचा मोह नाही असे स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ही उमरखेडमध्ये झाली होती. शेतकरी आत्महत्या करतोय, त्यांना बघायला कोणी येत नाही. त्यांचं कुटुंब काय करते ते ही बघत नाही. कारण आता माणसाची काही किंमतच उरली नाही.

आमची मनेच मेली आहेत. जर तुम्ही जिवंत आहात असे वाटत असेल तर आजवर ज्यांना मत दिली त्यांना नाकारा आणि मनसेला मतदान करा’, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघात बोलत होते.
अमेरिकचे राष्ट्रध्यक्ष ओबामा हे पदावरून खाली उतरत असताना त्यांनी एक कायदा केला होता. जेवढे कुत्रे बॉम्बस्फोटात जातील, त्यांना तुम्हाला परत अमेरिकेत आणावा लागेल. ज्या देशात कुत्र्याची काळजी आहे तर माणसाची किती असेल?’’ असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

तुमच्या दूध, पाणीपट्टी हे राजकारणी ठरवितात. मी येताना रस्ता पाहिला, काय रस्ता आहे हा? एका बाजूला खडी टाकली आहे. मी असा रस्ता जगात पहिला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०२४ साठी विकास आराखडा तयार केला आहे. बाकीच्यांना पुढची काही वर्षे आराम करू द्या. मी विकास कसा होतो, हे पाहिलं आहे. मी नाशिकमध्ये रस्ते बनवले. किती वर्षे झाले पाहा, अजूनही ते तसेच आहेत.
सगळ्या गोष्टी शक्य आहे. फक्त इच्छा पाहिजे. मला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही. पण मला महाराष्ट्राच्या विकासाची नक्कीच स्वप्न पडतात. असेही राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR