30.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeलातूरमहात्मा बसवेश्वराच्या अश्वारूढ पुतळ्याची शोभायात्रा

महात्मा बसवेश्वराच्या अश्वारूढ पुतळ्याची शोभायात्रा

निलंगा : प्रतिनिधी
सामाजिक समतेचा व मानवी कल्याणाचा संदेश देणारे बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे रविवारी दि १९ मे रोजी बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याची शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणुकीत डिजेऐवजी पारंपारिक बँड पथक, महिला शिव भजनी मंडळ, वारकरी भजनी मंडळ, संबळ पथक, हलगी पथक, गुगळ पथक, विदूषक पथक,आदींचा समावेश आला होता.
या शोभायात्रेतील पारंपारिक व सांस्कृतिक कलाप्रकाराने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. वचन गीत, पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सादर करीत बसवप्रेमी नागरिकांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थित हजारो लोकांनी महात्मा बसवेश्वरांचा जयघोष, फटाक्यांची आतिषबाजी व फुलांची उधळण करून महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले. या शोभायात्रेत धाराशिव जिल्ह्यातील वानेवाडी येथील आनंदाश्रम वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल भजनी मंडळाचे गोल ंिरगण व वारकरी नृत्य-गाणी, परळी येथील संबळ पथक, शिवभक्त वीरभद्रेश्वर यांचा वीरभद्र अवतार सादर करणारे पुरवंताचे विशेष नृत्य, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी पुरुष व प्राण्यांचे मोठे व उंच चेहरे दर्शविणारे  कर्नाटकातील विजापूर येथील जय हनुमान गुंमे कुनिता विदूषक पथक, मदनसुरी येथील विराट हलगी पथक, नंदीकोल ( उंच ध्वज काठ्या), लाईट छत्री, अनसरवाडा येथील बँड पथक,महिला शिव भजनी मंडळ, यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्काराने उपस्थितांची मने ंिजकली.
बँक कॉलनी येथे रथावर आकर्षक सजावट करण्यात आलेल्या बसवेश्वरांच्या मुर्तीचे मठाधिपती संगनबसव महास्वामीजी, अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंखे, शिवाजी रेशमे, विनोद आर्य, डॉ अरंिवद भातांब्रे, बाळासाहेब शिंगाडे, मनोज कोळ्ळे, अविनाश रेशमे अजित माने, गोंिवद शिंगाडे, अमोल आर्य, अशोक शेटकार, लाला पटेल, ओमप्रकाश बाहेती, बालाजी थेटे प्राचार्य डॉ सिद्धेश्वर पाटील, प्रल्हाद बाहेती, रजनीकांत कांबळे, विजयकुमार पाटील, ज्ञानेश्वर वाकडे, गोंिवद सुर्यवंशी, दयानंद चोपणे यांच्या हस्ते पूजन करून  मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. बँक कॉलनी रस्त्यावर महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, व्यापारी संजय धूत व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ंिलंबन महाराज रेशमे, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ,अ‍ॅड वीरभद्र स्वामी, शेषेराव मंमाळे, सुधीर पाटील, सुमित इन्नाणी, धम्मानंद काळे, अंकुश ढेरे, तम्मा माडीबोणे आदींनी महात्मा बसवेश्वरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बसव जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. शिवाजी चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने फळे व पाणी वाटप करण्यात आले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या बसव भक्तांसाठी व विविध कला पथकास प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय सोळुंके व अशोक साळुंखे यांच्या वतीने महाप्रसाद व महाराष्ट्र मशिनरी स्टोअर्स, सुमित ट्रेडिंग, पुजारी हॉटेल,चिंचोलीकर कापड दुकान, सिराज देशमुख यांच्या वतीने  पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. आनंदमुनी चौक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. मिरवणूक शांततेत व दिमाखात पार पडली. यावेळी निलंगा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी शिवाजी रेशमे  व विनोद आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ आग्रे , राजकुमार चिकराळे, इंजिनिअर एम. के. कस्तुरे, धनराज निला, शिवा रुकारे, नवनाथ कुडूंबले, मनोज कोळ्ळे, प्रकाश पटणे, शंकरप्पा भुरके, संतोष सोरडे, युवराज बिराजदार, प्रकाश शेटकार यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR