महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी

नागपूर : प्रतिनिधी
जेव्हा अजित दादा स्वत: म्हणत असतील की काही लोक नाराज आहेत, तेव्हा त्याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे. हा एवढा मोठा पुरावा त्यांनी दिला आहे. यांना जनतेचे काही घेणे-देणे नाही. या सरकारमध्ये काय गडबड सुरू आहे याच्यातून स्पष्ट होत आहे.

महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी आहे. आपसात लढून कार्यक्रम संपणार आहे. तसेच मलाईदार खात्यांकरता लढाई लांबत चालली आहे. हिवाळी अधिवेशनात हे खातेवाटप करू शकले नाहीत. जनतेसाठी हे सरकार काहीच करू शकले नाही. आता पालकमंत्र्यांसाठी कोणते जिल्हे घ्यायचे याची भांडणे होतील, असा दावा करत काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी महायुतीवर टीका केली आहे.

मरकडवाडीमध्ये तेथील जनतेच्या मागणीनुसार बॅलेटवर मतदान झाले पाहिजे. या सरकारने जनतेची मते यांनी चोरली. कालच निवडणूक आयोगाकडून नोटिफिकेशन काढण्यात आले. निवडणूक आयोगाकडून आता कोणतीही माहिती जाहीर केली जाणार नाही. याचा अर्थ दाल में कुछ काला है, असेही नाना पटोले म्हणाले.

राहुल गांधी यांचा दौरा आलेला आहे. ते नांदेडला जाणार आणि तिथून बाय रोड परभणीला जाणार आहेत. त्याच्यात आम्ही काही सुधारणा करू पाहतो आहोत. डिटेल दुसरा प्रोग्राम येईल असे वाटत आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या दौ-यावर टीका केली होती. त्यावर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. नौटंकी की हिटलरशाही?

महाराष्ट्र आणि केंद्रातील सरकारच्या माध्यमातून जी हुकूमशाही लोकशाहीत वापरल्या जात आहे. जनता आपले प्रश्न मांडण्यासाठी येते तेव्हा त्यांना कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जीवे मारण्यात येते, गुन्हे दाखल करण्यात येतात. या हुकूमशाही आणि हिटलरशाहीच्यामध्ये कोणी येत असेल, देशातील विरोधी पक्षनेता येत असेल आणि त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष नौटंकी म्हणत असेल तर भाजप लोकशाहीवर विश्वास न ठेवणारी पार्टी आहे. ज्यावेळी इंग्रजांचे सरकार होते तेव्हा भाजपचे मूळ असलेले लोक इंग्रजांबरोबर होते, असेही नाना पटोले म्हणाले.

जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्त्वाचे आहेत
उद्धव ठाकरे नुकतेच नागपूर विधान भवनात मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणून राजकीय चर्चा सुरू केली. माध्यमांनी राजकीय चर्चा करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे. विदर्भाच्या तोंडाला पाने पुसून हे लोक गेले आहेत. कोण कोणाला कुठे भेटला यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्त्वाचे आहेत, असे म्हणत आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी संदर्भात अधिक बोलणे टाळले आहे.

मागील वेळेस २० हजार कोटींचे बजेट अजित पवार यांनी मांडले होते. येणारे बजेट आणखी किती तुटीचे असणार आणि त्याचा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर पाडून महागाई वाढवणार. निवडणूक आयोगाच्या कृपेने बहुमतात सरकार आले. ते जनतेच्या कृपेने आलेले नाही. महागाई, शेतकरी यासाठी काय करणार? अनुशेष कशावरून काढणार की केवळ मूठभर लोकांना फायदा होईल.. हे संवेदनाहीन आणि लूट करणारे सरकार असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52
Video thumbnail
Latur|गणरायाच्या आरतीने एकमत कार्यालय भक्तिमय | धनंजय देशमुख उपस्थित
02:21
Video thumbnail
Nanded|झेंडावंदनावरून नांदेडमध्ये वाद! पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा
03:17
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेटचा दणका! 15 दिवसांत 12,561 जणांवर कारवाई
03:13
Video thumbnail
Latur|झाडात अवतरले गणराय! ‘ग्रीन लातूर’चा अनोखा गणेशोत्सव
03:29
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
04:28
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये सोयाबीन पिकावर संकट!दुष्काळ जाहीर करा,शेतकऱ्यांची मागणी
01:53
Video thumbnail
Latur|जगायला बळ द्या, अन्यथा मारून टाका!” शिरूर अनंतपाळमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश
03:37
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
09:37
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36

Latest news