23.4 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeलातूरमहायुती सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका

महायुती सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका

लातूर : प्रतिनिधी
गेल्या दहा वर्षात महायुतीने महाराष्ट्रातील मतदारांची फसवणूक केली आहे. महायुती सरकारने जनतेला खोटी आश्वसने देवून त्याची दिशाभूल केली आहे. त्यामुळे येणा-या २० नोव्हेबर रोजी मतदार बंधु-भगिनींनी महायुवतीच्या कोणत्याही जाहीरातीला किंवा आश्वासनाला बळी न पडता कॉग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रावून आपले आमदार धीरज देशमुख यांना मतदान रुपी आशिर्वाद द्यावा, असे आवाहन विलास सहकारी साखर कारख्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले. रेणापूर तालूक्यातील कोळगाव, निवाडा, शेरा येथे दि. ५ नोव्हेंबर रोजी महिला संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या संस्थापीका सौ. दीपशिखा धीरज देशमुख, सुनिताताई अरळीकर, पुजाताई इंगे, इंदुताई इंगे, शिवकन्याताई पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना म्हाणाल्या कि, मागील दहा वर्षाच्या काळात आपण सर्वानी बघितले आहे की, महायुती सरकारने सगळी खोटी आश्वासने महाराष्ट्रातील जनतेला दिले आहेत. त्यानी पहिल्या पाच वर्षात देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक गरीबाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षीत युवक-युवतीना वर्षाला दोन कोटी नोक-या देण्याचे सांगीतीले तेही या सरकारने दिले नाही. त्यामुळे महायुती सरकारच्या खोट्या जाहीरातीला किंवा खोट्या आश्वासनाला मतदार जनतेने बळी पडू नये, असे आवाहन केले. सर्व मतदार महिलांनी विचार केला पाहिजे, कारण ५० टक्के महिलानादेखील मतदार आहेत. महिलांचे मत हे काँग्रेस शिवाय जाणार नाही. याची काळजी सर्व महिलांनी घेतली पाहिजे. त्यामुळे येणा-या २० नोव्हेबरला सर्वानी लातुर ग्रामीनचे आमदार धीरज देशमुख यांना प्रचंड मतदान करून लातूर ग्रामीणचा सर्वागिण विकास करण्याची संधी परत ऐकदा द्यावी. आमदार धीरज देशमुख जरी माझा मुलगा असला तरी मी तूमच्या पदरात टाकला  आहे. त्यामुळे आपण सर्वानी त्यांचा प्रचार करुन त्यांना प्रचंड मतानी विजया करावे, असे आवाहन केले.
कोळगावच्या संवाद बैठकीस केशरबाई हाके, वर्षाताई कोडगिरे, अनिता हाके, सुरेखा हाके, मनिषा हाके, संगीता हाके, सुमन हाक,े रुक्मिन हाके, कमल ठोेंबरे, लोपाबाई हाके, कविता ठोंबरे, वंदना ठोंबरे, शिवकन्या हाके, सुविधा गरदे, पल्लवी तांबे, माधवी पाटील, वैष्णवी काळे, मेघा देवकते, शुभांगी करणूर, वैशाली हाके, सुनिता पवार, ललीता हाके, काशीबाई पुरी, प्रयागबाई पूरी, सुभद्रा गडदे, निवाडा येथील बैठकीस रेखा डोके, निता माशाळकर, लक्ष्मीबाई साळूंके, राजमती साळुंके, वंदना साळूंके, भाग्यश्री बनसोडे, आशा कसपटे, मीरा घारुळे, सुदामती साळूंके, मीना नवाडे, मंगल उरगुंडे, पार्वती कसपटे, मीना गायकवाड, विजया कारंजे, मंगल साळुंके, इंदुबाई गायकवाड, सुरेखा साळुंके, जनाबाई जाधव, यशोदा जाधव, उत्तरा गिरी, भाग्यश्री उरगुंडे, अनुराधा वाघमारे, शीला माशाळकर आदी उपस्थित होत्या.
शेरा येथील संवाद बैठकीस सुदामती पवार, रतनबाई सोनवणे, वंदना कांबळे, वैशाली भुतके, फरजाना शेख, शमाबी शेख, सुवर्णमाला सोनवणे, सीमा शेख, लैला शेख, अरिफुन शेख, जैतून शेख, परविन शेख, हमजा शेख, शाहिन शेख, अन्वर शेख, सुलोचना कांबळे, संध्या कांबळे, भाग्यश्री कांबळे, किरण कांबळे, धोंडुबाई कांबळे, भाग्यश्री कांबळे, मिरा पाटोळे, कलावती कांबळे, शिवाबाई कांबळे,  सुलोचना सुरेश कांबळे,वैशाली महादेव भूतके, शोभा शिवाजी कांबळे, नीलूबाई हरिभाऊ कांबळे, जनाबाई न्यानोबा कांबळे, कलावंती विठ्ठल कांबळे,शोभा साहेब कांबळे, निर्मला बालासाहेब भुतके आदी उपस्थित होत्या.
लातूर तालुक्यातील पेठ येथे मंगळवारी सायंकाळी श्रीमती वैशालीताई देशमुख यांची पदयात्रा व महिला संवाद बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर मतदार संघात केलेल्या कामाची माहिती दिली.  यावेळी सुनीताताई अरळीकर, शितलताई फुटाणे, जुबेदाबी शेख, सावित्रीबाई लाळे, सुमनबाई सूर्यवंशी, आशाबाई सूर्यवंशी, कलावती सूर्यवंशी, कालींदा साळुंके, लक्ष्मीबाई साळुंके, शीलाताई सूर्यवंशी, सरस्वती पांडवळे, चंद्रकला वाडकर, शालुबाई पाटील, कौशाबाई नरवाडे, सुधामती गिरी, छायाबाई करवंजे यासह आदी महिला व गावातील मंडळी व काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR