30.5 C
Latur
Sunday, March 23, 2025
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्र भूषण म्हणजे माझ्या कामाचा सन्मान : राम सुतार

महाराष्ट्र भूषण म्हणजे माझ्या कामाचा सन्मान : राम सुतार

 

नवी दिल्ली : प्रतिनिधी
मी मुळ मराठी आहे, महाराष्ट्राचा आहे. काम करून दिल्लीत पोचलो. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची बातमी ऐकल्यानंतर मला खुप आनंद झाला. केवळ मलाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला या गोष्टीचा आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाचा सन्मान आहे, गौरव आहे, असे मी समजतो. यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो.

अगदी तरुण वयात मी कामाला सुरुवात केली. १९४८ मध्ये मी महात्मा गांधींचा पहिला पुतळा बनवला होता. अनेक वर्षांपूर्वी एक गणेशमुर्ती तयार केली होती. एक शेतक-याचा आणि बॉडी बिल्डरचा पुतळा बनवला होता.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण जाहीर करण्यात आला. यानिमित्ताने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यापूर्वी त्यांना भारत सरकारच्या वतीने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. संसद भवन, राष्ट्रपती भवन यांसह देश-विदेशात त्यांनी बनवलेले पुतळे पाहायला मिळतात. जगाच्या पाठीवर अनेक पुतळे त्यांनी आजवर बनवले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR