16.5 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeलातूरमहावितरणच्या परिमंडळ कार्यालयास आग

महावितरणच्या परिमंडळ कार्यालयास आग

लातूर : प्रतिनिधी
येथील जुने पॉवर हाऊस परिसरात असलेल्या महावितरण परिमंडळ कार्यालयाला मध्यरात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.  या आगीमध्ये सर्व फर्निचर, सिल्ािंग पीयुपी, संगणक, प्रिंटर तसेच काही दस्तऐवज जळून खाक झाला आहे.
प्रथमदर्शनी शॉर्ट सर्कीट होवून आग लागली असावी, असा अंदाज आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास सुरक्षा रक्षकाला परिमंडळ कार्यालयाच्या खिडकीतून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. पाहता पाहता आग भडकल्याने सर्व  खिडक्यामधून आगीचे लोट बाहेर पडत होते. तत्काळ याबाबत अग्निशमन व गांधीचौक पोलीस ठाण्यास आग लागल्याची माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी व पोलीस अधिका-यांनी दखल घेत त्वरीत घटनास्थळी भेट दिली.   या आगीमध्ये कर्मचा-यांसंबंधीत असलेली दैनंदिन कागदपत्रे, दररोजच्या कामासाठी लागणारी स्टेशनरी तसेच काही जुने रेकॉर्ड जळाले आहेत. लोखंडी कपाटात असलेली कागदपत्रे, सर्व्हिस बुक मात्र सुरक्षीत राहीली आहेत. महावितरणचे संपुर्ण कामकाज हे ऑनलाईन झाले असल्याने व दरमहा सर्व बॅकअप घेण्याची व्यवस्था असल्यामुळे सर्व रेकॉर्ड सुरक्षीत आहे.
त्याचबरोबर आयटी तज्ञांच्या मतानुसार संगणकातील हार्ड ड्राईव्ह सुरक्षीत असल्याने त्यामधील डाटा परत मिळवणे शक्य आहे. मात्र सर्व विभागाचे फर्निचर, सिलींगचे पीओपी, जळालेली संगणके, असे मिळून अंदाजे ८० ते ८५ लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मालमत्ते शिवाय या आगी मध्ये दुसरे कुठलेही नुकसान झालेले नाही.  परिमंडळ कार्यालयाचे दैनंदिन काम पुर्ववत सुरू रहावे यासाठी पर्यायी जागेची पाहणी केली जात असून तीन चार दिवसात कामकाज सुरू होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR