लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सरकारी-निमसरकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने राज्यभरातील सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालय व महाविद्यालय यांच्यासमोर भोजनाच्या समयी दुपारी १ ते २ या कालावधीत कर्मचा-यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी निर्दशने करण्याचे ठरले होते. त्यानुसार दयानंद कला, वाणिज्य, विज्ञान व विधी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी शासनाच्या विरोधात निर्दशने केली.
यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागु करणे, राज्य शासकीय कर्मचा-याप्रमाणे १०, २०, ३० लाभाची योजना लागू करणे, रिक्त पदांची भरती करणे व नवीन शैक्षणिक धोरण-२०२० रद्द करणे या प्रमुख मागण्यासाठी हे अंदोलन करण्यात आले. यावेळी स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे अधिसभा सदस्य धनराज जोशी, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव, राजेश सेलुकर, संजय व्यास, दत्तात्रय आळंदकर, बालकृष्ण अडसुळ, सुनील खडबडे, लक्ष्मीकांत वाघ, बालाजी चित्ते यांच्यासह सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.