मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम संसदीय मतदारसंघ १६४ वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील वर्सोवा,यारी रोड येथील गुलाबी मतदान केंद्र महिलांना समर्पित केले आहे. महिलांना समर्पित विशेष मतदान केंद्र १६४ वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक – २०८ हे सर्व-महिला व्यवस्थापित मतदान केंद्र आहे.
हा लिंग समानता आणि निवडणूक प्रक्रियेत महिलांचा अधिक रचनात्मक सहभाग असावा यासाठी वचनबद्ध केलेला उपक्रम आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशा नुसार दिले प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक ‘सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्र’ असावे जेथे पोलिस आणि सुरक्षा कर्मचा-यांसह संपूर्ण मतदान कर्मचारी महिला असतील.त्यानुसार सदर मतदान केंद्र महिलांनी समर्पित केले आहे अशी माहिती येथील सहायक निवडणूक अधिकारी सुभाष काकडे यांनी दिली.