लातूर : प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील एका महिला वकील भगिनीला करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचा महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्सच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स संघटनेच्या अध्यक्षा अॅड. जयश्रीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा न्यायालयाच्या महिला विधिज्ञ कक्षात शनिवारी महिला विधिज्ञांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आपले मनोगत व्यक्त करताना अॅड. जयश्रीताई पाटील यांनी हा हल्ला केवळ एका वकील भगिनीवरील हल्ला नसून संपूर्ण स्त्री शक्तीवरील हल्ला आहे. महिला वकिलावर हल्ला करणे म्हणजे कायद्यावरच हल्ला करण्यासारखा प्रकार आहे. या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. अशा प्रकारचे भ्याड कृत्य यापुढे कोणाच्याही हातून होणार नाही, याकरिता दोषींवर कायदेशीर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित महिला विधिज्ञांनी महिला विधिज्ञ भगिनीस करण्यात आलेल्या भ्याड मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध केला.
याप्रसंगी अॅड. सुप्रिया मुथापू, अॅड. अरुणा वाघमारे, अॅड. अभिलाषा गवारे, अॅड. मनिषा दिवे, अॅड. पल्लवी कुलकर्णी, अॅड. तृप्ती इटकरी , अॅड. किरण चिंते, अॅड. छाया माळवदे , अॅड. वसुधा नाळापूरे, अॅड. अंजली जोशी, अॅड. प्रतिभा शेळके, अॅड. बिना राऊत, अॅड. गायत्री नल्ले, अॅड. वीणा पाठक ,अॅड. सपना बोरा, अॅड. कांचन वाघन्ना, अॅड. कीर्ती जाधव, अॅड. मीरा कुलकर्णी, अॅड. सुरेखा जानते , अॅड. सुप्रिया कोंपले , अॅड. सुनंदा इंगळे, अॅड.सुरेखा बेलुरे ,अॅड. प्रतिभा कुलकर्णी, अॅड. पद्मा परमा, अॅड.चारुशीला पाटील, अॅड. सोफिया शेख यांसह महिला वकील संघटनेच्या सर्व पदाधिका-यांची उपस्थिती होती.