मुंबई : प्रतिनिधी
अंजली साखरे व्हॅलिएंट फेम आयकॉन फाऊंडेशन यांनी सिव्हिल डिफेन्स आणि सेंट्रल रेल्वे यांच्या सहकार्याने महिला सशक्तीकरण आणि सुरक्षिततेसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन सीएसएमटी रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म क्र. ८ येथे ३ मार्च २०२५ रोजी केले. हा कार्यक्रम सकाळी ९:३० ते ११:३० दरम्यान पार पडला, ज्यामध्ये नागरिक, सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक आणि रेल्वे अधिका-यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. विशेष सेल्फी आणि स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले, जिथे उपस्थितांनी या उद्देशासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सेंट्रल रेल्वे आणि सिव्हिल डिफेन्सचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. अमित कुमार मंडल, डेप्युटी कंट्रोलर सेंट्रल रेल्वे, एस. एस. वैद्य, आशिष कांसकर, आणि वरिष्ठ कर्मचारी अधिकारी, सिव्हिल डिफेन्स स्टाफ कॉलेज राजेश्वरी कोरी, बी. डी. इप्पार, इन्स्पेक्टर ऍडमिन, आरपीएफ मुंबई विभाग फाऊंडेशनचे तीन संचालक उन्नती जेठवा, संतोष साखरे आणि अंजली साखरे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्रेय सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक तसेच अंजली साखरे व्हॅलिएंट फेम आयकॉन फाउंडेशनच्या टीमला जाते. सोनाली, चित्राली, कनिका आणि सुनील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.