36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeलातूरमांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संकुलात १०१ जणांनी केले रक्तदान

मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संकुलात १०१ जणांनी केले रक्तदान

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व, सुसंस्कारी राजकारण आणि शिस्तीचे प्रशासक म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. त्यांचया ७५ व्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असा संकल्प करून रक्तदान शिबिराचे आयोजन  केले होते. परंतु, वाढता प्रतिसाद मिळाल्याने १०१ जणांनी रक्तदान केले.
येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील  या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रेणा सहकारी सहकार कारखान्याचे माजी चेअरमन यशवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. अजय पाटील, प्राचार्य डॉ. आनंद पवार, प्राचार्य डॉ. सुधाकर कुलकर्णी, प्राचार्य डॉ. सचिन डिग्रसे, प्राचार्या डॉ. आशा मुंडे यांच्यासह मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट येथील महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विविध विद्यालयातील मुख्याध्यापक बंकट पवार, भागवत माने, सुरज भिसे, जयंत शिंदे, परचंद झाडके, संगीता मोरे, अंकुश पिसे,  बाजीराव पाटील, प्रा. डॉ. मुळजे तसेच  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट कर्मचा-यांच्या सहभागातून झालेल्या या रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. वेदप्रकाश मलवाडे, प्रा. शंकर चव्हाण, प्रा. डॉ. बी. ए. कांबळे व जगन्नाथ कुलकर्णी, तांत्रिक नयन पाटील, राम राठोड, कृष्णा चाटे, नुरजहाँ तांबोळी, साधना साबणे, सरस्वती मुदामे, जीवन साबळे, कुंभार बी. व्ही., नानासाहेब देशमुख, विष्णु चन्नागिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.  सूत्रसंचालन प्रा. डॉ. कुमार बनसोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR