लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराठी महत्वपूर्ण असलेल्या मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत जोरदार पाऊस पडलेला नसल्यामुळे पावसाळ्याचे अडीच महिने संपत आले तरी मांजरा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. दि. ७ ऑगस्ट रोजी मांजरा धरणाचा पाणीसाठा २.३२ टक्क्यांवरच आहे. मांजरा धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होण्याकरीता मोठ्य पावसाची आवश्यकता आहे.
केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात एकुण पाणीसाठा ५१.२२७० दशलक्ष घनमीटर एवढा आहे. ४७.१३० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा ४.०९७ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी २.३२ एवढी आहे. लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा धरणात एकुण पाणीसाठा ५६.७५२० दशलक्ष घनमीटर आहे. मृत पाणीसाठा २९.९६७ दशलक्ष घनमीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा २६.७८५ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी २९.३६ इतकी आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांत एकुण पाणीसाठा ४७.७०३ दशलक्ष घनमीटर आहे.
मृत पाणीसाठा १७.६८२ दशलक्ष घनमीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा ३००२१ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी २४.५८ इतकी आहे. १३४ लघु प्रकल्पात एकुण पाणीसाठा १२६.२०२ दशलक्ष घनमीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा ९५.६७६ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी ३०.४४ इतकी आहे. जिल्ह्यातील एकुण १४४ प्रकल्पांत एकुण पाणीसाठा २८१.८८५ दशलक्ष घनमीटर आहे. मृत पाणीसाठा .९४.७८ दशलक्ष घनमीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा १५६.५८० दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी २२.२२ एवढी आहे.
जिल्ह्यातील तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा या आठ मध्यम प्रकल्पांपैकी दोन मध्यम प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. १३४ लघ प्रकल्पांपैकी २ पुर्ण भरलेले, ४ लघू प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, ७ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के, १५ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ४८ प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या खाली, ५४ लघु प्रकल्प जोत्याखाली तर ४ लघू प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत. जिल्ह्यातील एकुण १४४ प्रकल्पांपैकी २ पूर्ण भरलेले, ४ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा, ९ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा, १६ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के पाणीसाठा, ५३ प्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा, ५६ प्रकल्प जोत्याखाली तर ४ प्रकल्प कोरडे आहेत.