लातूर : प्रतिनिधी
राज्यातील साखर उद्योगात भरारी घेणा-या लातूरच्या मांजरा साखर परिवारातील विलास साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातलेली असून शेतक-यांच्या हितासाठी या मांजरा साखर उद्योगाने अतीशय उच्चांकी भाव देवुन शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. या परिवाराच्या सर्व साखर कारखाने अतीशय चांगले चालत असल्याने आगामी काही दिवसात निवडणुका होणार असल्याने त्या निवडणुकीत राजकारण न करता निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. यासंदर्भात बुधवारी लातूर येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, लातूर जिल्ह्यातील साखर उद्योग हा मांजरा परिवाराचा असून या परिवाराने शेतक-यांचा विश्वास संपादन करत उच्चांकी दर शेतक-यांना दिला आहे. अतीशय काटकसर करुन गेल्या ३८ वर्षात एकदाही उसाचे पेमेंट थकलेले नाही.
जिल्ह्यांच्या परिसरात जिथे या परिवारातील साखर कारखाने ऊभे आहेत. तिथे लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुबत्ता देण्याचे काम याच परिवाराने केले आहे. या साखर कारखान्याची आमचे चुलीच नात आहे. त्यामुळें या परिवारातील साखर उद्योग चांगले चालत असल्याने उस उत्पादक शेतक-यांनी सकारात्मक भूमिका घेवून उज्वल भविष्यासाठी राजकारण न आणता विलास, मांजरा, रेणा साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने केली आहे. राजकारण आले तिथे कारखाने मोडकळीस गेले: जिल्ह्यातील मांजरा साखर परीवार राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिश्य पारदर्शकपणे कार्य करीत असून या परिवारात कधी कारखान्यात राजकारण केलं नाही. त्यामुळेच ही साखर कारखानदारी टिकली नव्हे तर राज्यात याच परिवाराने नावलौकिक मिळवला आहे.
दुसरीकडे जिल्ह्याच्या परिसरात जिथे राजकारण व निवडणुका झाल्या तिथं साखर कारखाने डबघाईला आलेले दिसत आहेत. जिल्ह्यातील जयजवान जयकिसान सहकारी साखर कारखाना (नळेगाव) स्वामी रामानंद तीर्थ सहकारी साखर कारखाना किल्लारी, वैजनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी जिल्हा बीड, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना आंबुलगा तालुका निलंगा, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना तेरणा (ढोकी) अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना (अंबाजोगाई) या सर्व कारखान्याचे उदाहरण समोरच आहे.
त्यामुळे आगामी होणा-या मांजरा परिवारातील साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे, प्रदेश कोअर कमिटी सदस्य सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष हुडे प्रज्योत, दत्ता किंनिकर, नवनाथ शिंदे (लातूर ग्रामीण) मारुती कसबे, अशोकराव दहिफळे (रेणापूर), नवनाथ शिंदे, निलेश बिरादार, अमर हैबतपुरे, किशोर बरगले, शरद रामशेटे, श्याम जाधव, गौतम कांबळे यांनी मागणी केली आहे