17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरमांजरा परिवाराने ऊसउत्पादक शेतक-यांना दिले एफआरपीपेक्षा जास्तीचे ८० कोटी रुपये

मांजरा परिवाराने ऊसउत्पादक शेतक-यांना दिले एफआरपीपेक्षा जास्तीचे ८० कोटी रुपये

लातूर : प्रतिनिधी
सहकारात चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे माझे मोठे बंधू लोकनेते विलासराव देशमुख यांनी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यातील सर्वच खात्यांचे मंत्री,  आमदार म्हणून अतिशय चांगल कार्य केलेले आहे. मी लहान भाऊ म्हणून त्यांच्या सावलीत राहुन चांगल काम करण्याचा प्रयत्न करत असुन समोर बसलेली उपस्थिती पाहून मी प्रेमाने भारावून गेलो आ.े मला मिळालेला साखर गौरव पुरस्कार जिल्ह्यातील उस उत्पादक सभासदांना समर्पित करतो, असे नमुद करुन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव  देशमुख पुढे म्हणाले, मांजरा परिवारातील  जिल्ह्यातील साखर कारखान्याकडून एफआरपी पेक्षा ८० कोटी रुपये जास्तीचे शेतक-यांना देण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले आहे.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल देवणी तालुक्यातील वलांडी येथे डॉ. अरविंद भातांब्रे यांच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा नागरी सत्कार दि. ९ सप्टेंबर रोजी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन मानकरी होते तर प्रमुख पाहूणे म्हणून खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, माजी आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, कांग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, डा. अरविंद भातांब्रे, दिलीप पाटील नागराळकर, अजित बेळकुने, अजित माने, विजयकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  पुढे बोलताना माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले की, आज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांनी ५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणारी ही बँक देशातील पहिली ठरली आहे.  बँकेने महिला बचत गटासाठी १० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवलेला आहे तर लाडकी बहिण योजना अंतर्गत महिला भगिनींना शून्य बॅलन्स ने २५ हजार खाते उघडून देण्याचा ऐतिहासिक निर्णय  घेतला त्यामुळें आम्ही ३ कोटी ७५ लाख रुपये ओवाळणी भेट दिली आहे.
याप्रसंगी खासदार डॉ शिवाजीराव काळगे, अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंखे बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार धर्माजी सोनकवडे यांनी मनोगत व्यक्त्त केले. कार्यक्रमास बंडाप्पा काळगे, जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव बिरादार, देवणीच्या नगराध्यक्ष सौ घोरपडे, राम भंडारे, आरती भंडारे,  हमीद शेख, सचिन दाताळ, संभाजी रेड्डी, सोनू डगवाले, आबासाहेब पाटील, हरिराम कुलकर्णी, अमीत मानकरी, सुपर्ण जगताप, शिवाजी कांबळे, संभाजी सुळ, सुतेज माने, कुषावर्ता बेल्ले, वैजनाथ लुल्ले, संजय  बिराजदार, बंडलेताई, संजय रेड्डी रामंिलग मुळे, भगवान गायकवाड, अनिल पाटील, चक्रधर शेळके,  महेश देशमुख, सतीश पाटील यांच्यासह महिला, पुरुष कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR