23.7 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeक्रीडाभारतीय क्रिकेट संघ पाकमध्ये जाणार नाही!

भारतीय क्रिकेट संघ पाकमध्ये जाणार नाही!

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून आहे. आयसीसी स्पर्धेच्या आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तयारी केली आहे. मात्र भारतीय संघ पाकिस्तानात येणार की नाही यावर घोडे अडून बसले आहे. भारत सरकाराने परवानगी दिली तरच टीम इंडिया पाकिस्तानात येईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा सरळ अर्थ भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही असाच निघत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, ‘जोपर्यंत तिथला दहशतवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तान सरकारशी कोणतीही चर्चा करणार नाहीत. त्याआधी आम्हाला जम्मू काश्मीरमधील तरूणांचे मत जाणून घ्यायचे आहे आणि त्यांच्याशी बोलायचे आहे.’ अमित शाह यांचे हे विधान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलाही लागू होत आहे. त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR